A.T Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Loksabha Constituency : ए.टी. पाटलांनी जळगाव लोकसभेसाठी पुन्हा ठोकला शड्डू!

कैलास शिंदे

Loksabha Election 2024 : भारतीय जनता पार्टीचे सलग दोन टर्म जळगाव लोकसभेचे खासदार राहिलेले ए.टी.पाटील यांना तिसऱ्यांदा सन 2019 मध्ये उमेदवारी निश्‍चित होती, परंतु ‘एक क्लीप’व्हायरल झाली अन् सगळे पारडेच फिरले आणि पक्षाने त्याची उमेदवारी रद्द केली.

त्यामुळे ए.टी. पाटील तिसऱ्यांदा उमेदवारीची अन् खासदारकीच्या हॅटट्रीकचा विक्रम करण्याची संधीही हुकली. परंतु आता पुन्हा पाटील यांनी पक्षाकडे जळगाव लोकसभेचे उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त करत शड्डू ठोकला आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकिसाठी सध्या ते दिल्लीत आहेत. तेथे त्यांनी पक्षाच्या वरिष्ठाकडे उमेदवारीबाबत दावा केल्याची माहिती समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पार्टीचे(BJP) माजी खासदार ए.टी.पाटील जळगाव लोकसभा मतदार संघातून सलग दोन पंचवार्षिक मध्ये निवडून गेले आहेत. सन 2008 मध्ये आणि 2014मध्ये ते खासदार म्हणून निवडून गेले आहेत. यानंतर लोकसभा निवडणुकीत सन 2019 मध्ये तिसऱ्यांदा त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असतांना, ऐनवेळी एक‘क्लीप’ सोशल मीडीयावर व्हायरल झाली अन् पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द केली होती.

त्यांनतर ही क्लीप पक्षाच्या अंतर्गत स्पर्धेतून व्हायरल झाल्याचीही चर्चा होती. त्यांनतर काही काळ ते अज्ञात वासातही होते. परंतु हळू ते पक्षाच्या कार्यात सक्रिय झाले पक्षाच्या अनेक बैठकिला त्यांची उपस्थितीही होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT