MLC Election : नाशिक विधानपरिषदेची स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला सुटली आहे. शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत.
मात्र, भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते व प्रसाद हिरे यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने नरेंद्र दराडे यांचा मार्ग कठीण बनला आहे. नाशिकचा हिशोब चुकता करण्यासाठी शिवसेनेने देखील जळगावात आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
जळगावात भाजपचे नंदकिशोर महाजन हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे. ते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून शरद तायडे रिंगणात आहेत.
मात्र, शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे. याशिवाय भुसावळचे प्रहार संघटनेचे अनिल चौधरी हेही अपक्ष रिंगणात आहे. परिणामी जळगावची लढत चौरंगी झाली असून भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांना मतविभाजनाचे आव्हान पेलावे लागणार आहे.
जळगावात भाजपच्या बंडखोरांनी माघार घेतली तरच आपण माघार घेऊ अशी भूमिका जळगावात शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी माघारीच्या दिवशी घेतली होती. त्यानंतर, मंत्री गुलाबराव पाटील यांनीही नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला बंडखोरांनी पाठिंबा दिल्यास, जळगावातही दिला जाऊ शकतो असे सूचक विधान केल्याने नाशिक व जळगावच्या जागेचा संबंध कसा जोडला गेला आहे हे स्पष्ट झालं.
गुरुवारी (दि. ४) उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी जळगाव व नाशिक दोन्हीकडे मोठा हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. नाशिकमध्ये अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचे बंडखोर गोकुळ गिते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकले नाही. गोकुळ गितेंनी शेवटपर्यंत ससपेन्स ठेवला व माघार घेतलीच नाही.
त्याचवेळी जळगावात रेश्मा काळेही नॉच रिचेबल होत्या. नाशिकला भाजप बंडखोर गोकुळ गिते व प्रसाह हिरे यांची माघार होत नाही, तोपर्यंत जळगावात बंडखोर उमेदवाराची माघार होणार नसल्याची भूमिका घेत शिवसेनेने काळेंचा अर्ज कायम ठेवला आहे.
एकीकडे शिवसेनेचे नेते नाशिकमध्ये गोकुळ गिते यांच्याशी संपर्क करत होते. तर, दुसरीकडे गिरीश महाजन यांनी शिवसेनेच्या नेत्यांसोबत संपर्क साधून रेश्मा काळे यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले. मात्र, नाशिकमध्ये भाजपच्या गोकुळ गिते व प्रसाद हिरे यांनी अर्ज माघारी न घेतल्याने जळगावातही रेश्मा काळे यांनी माघार घेतली नाही.
तसेच नाशिक येथे भाजपच्या बंडखोराने उमेदवारी अर्ज मागे घेतला असता, तर मी देखील माघारीचा विचार केला असता, असे रेश्मा काळे यांनी सांगितल्याने त्यांची बंडखोरी ही नाशिक येथील भाजपच्या बंडखोरीचा बदला घेण्यासाठीच होती हे स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.