Nashik MLC Election : महाजन-सामंत यांच्यात का रे दुरावा? गोकुळ गितेंची समजूत काढायला आले पण दोघे एकमेकांना भेटले सुद्धा नाही

Nashik MLC Gokul Gite, Girish Mahajan, Uday Samant : गोकुळ गिते यांना बंडखोरी मागे घेत नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर करावा अशी इच्छा सामंत यांची आहे. त्यासाठी त्यांनी गोकुळ गिते यांचे बंड थोपवण्यासाठी मंत्री महाजन यांना आवाहन केले होते.
Girish Mahajan, Gokul Gite,Uday Samant.
Girish Mahajan, Gokul Gite,Uday Samant.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेले गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी नाशिक विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. त्यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यापुढे तगडे आव्हान उभे राहिले असून त्यांचा मार्ग खडतर झाला आहे.

मंत्री गिरीश महाजन हे गोकुळ गिते यांची बंडखोरी थोपवतील अशी आशा शिवसेना मंत्री उदय सामंत यांना होती. त्यासाठी त्यांनी महाजनांना वारंवार साद घातली. मात्र, आजूनही त्यात महाजनांना यश आलेलं नाही. गोकुळ गिते यांचे बंड शमवण्यासाठी शुक्रवारी नाशिकमध्ये आलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एकमेकांनाच भेटणे टाळल्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

गणेश गिते व गोकुळ गिते दोघेही मंत्री गिरीश महाजन यांचे ऐकतात. असे सांगत सामंत यांनी गिते बंधू आणि महाजन यांच्या संबंधाचा वारंवार उल्लेख केल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी दोन्ही नेते नाशिकमध्ये होते. दोघांनीही गोकुळ गिते यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले. गोकुळ गिते नाशिकबाहेर असल्यामुळे महाजन, सामंत यांच्याशी त्यांचे फोनवरच बोलणे झाले. त्यामुळे कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र, या दरम्यान सामंत-महाजन दोघेही एकमेकांना भेटले नाहीत.

Girish Mahajan, Gokul Gite,Uday Samant.
Nashik MLC Election : मंत्री उदय सामंतांनी दुसऱ्यांदा लावला जोर; दराडेंना बिनशर्त पाठिंबा देण्याची गोकुळ गितेंना विनंती

वेळ न मिळाल्याने मंत्री सामंत यांची भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. तर, राजकारणात समज-गैरसमज होत असतात. ते वेळेवर दूर केले तर त्याचे परिणाम दूरगामी होत नाहीत, असे सूचक वक्तव्य सामंत यांनी केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

वास्तविक दोघेही एकत्र येऊन यावर तोडगा काढू शकले असते किंवा गोकुळ गितेंची मनधरणी करु शकले असते. दोन्ही मंत्री एकमेकांना भेटले नाहीत. त्यामुळे दोघांमध्येच नाराजीची चर्चा आता कार्यकत्यांमध्ये सुरू झाली आहे. नाशिकमधील शिवसेनेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्याविरोधात भाजपच्या गोकुळ गिते व प्रसाद हिरे दोघांनीही बंडखोरी केली आहे. त्यातूनच दोन्ही नेत्यांमध्ये तणाव निर्माण होऊन भेटीगाठी टाळल्याच्या चर्चा आहे.

Girish Mahajan, Gokul Gite,Uday Samant.
MLC Election : नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे बंडही शमले; गोकुळ गिते मात्र अडून बसले, हॉटेलात झालेल्या त्या बैठकीत काय ठरलं?

गोकुळ गिते सध्या नाशिकबाहेर आहेत. त्यांच्याशी बोलणे झाले असून, ते परत आले की चर्चा होऊन हा प्रश्न मार्गी लागेल. आज-उद्यामध्ये हा विषय पूर्णपणे मार्गी लागेल असे मंत्री महाजन यांनी सांगितले. तर, गिते बंधूंनीच आम्ही महाजन साहेबांचे ऐकतो, असे सांगितल्याने मी त्यांचे नाव घेतले. मला महाजनांचे खच्चीकरण करायचे नाही आणि त्यांनाही माझे खच्चीकरण करायचे नाही. आम्ही दोघेही महायुतीचे मंत्री आहोत. सर्वांनी मिळून सुवर्णमध्य काढावा आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत, हीच आमची भूमिका आहे,' असे सामंत यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com