Jalgaon Politics : जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. महायुतीमध्ये झालेल्या जागावाटपात जळगाव विधानपरिषदेची जागा भाजपने कायम राखली आहे. शिवसेना देखील ही जागा मिळवण्यासाठी आग्रही होती, परंतु भाजपने ही जागा आपल्याकडेच ठेवली. भाजपचे नंदकिशोर महाजन हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे. मात्र, त्यांच्यापुढे शिवसेनेच्या (शिंदे गट) बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांचे आव्हान आजून कायम आहे. रेश्मा काळे कालपासून सहलीवर गेल्या असून नॉट रिचेबल आहे.
रेश्मा काळे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने महाजन यांच्यापुढे बालेकिल्ल्याच बंडखोरी थोपवण्याचं आव्हान उभ राहिलं आहे. महिलांना स्थान मिळावे, यादृष्टीने उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय रेश्मा काळे यांनी घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. आज अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे. अशात रेश्मा काळे यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची भिती आहे.
जळगाव विधानपरिषदेसाठी महायुतीने भाजपचे नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शेवटच्या क्षणी शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी अर्ज दाखल केला होता. आपण निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचे सांगत त्यांनी कालपासून जळगावमधून बाहेर पडत त्या सहलीलाल गेल्या आहेत. वणी येथील संप्तशृंगी गडावर दर्शन घेतानाचे त्यांचे व्हिडीओ व फोटो देखील समाजमाध्यंमांवर फिरत आहेत.
मंत्री गिरीश महाजन यांनी कोणाचेही बंड कायम राहणार नाही, सगळ्यांची समजून काढली जाईल असे म्हटले होते. मात्र, माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत रेश्मा काळे यांनी घेतलेली भूमिका गिरीश महाजनांसाठी तापदायक ठरत आहे. रेश्मा काळे यांचे बंड थोपवण्यासाठी गिरीश महाजन काय तोडगा काढणार हे पाहावे लागेल. महाजन हे त्यासाठी मुंबईहुन जळगावात दाखल झाले आहेत. यासंदर्भात ते मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करु शकतात. त्यामुळे दोघांमध्ये काय तडजोड होते ते पाहावे लागेल.
दुसरीकडे नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना गणेश गिते यांचे बंड शमवण्यात यश आलं आहे. त्यांनी समजूत काढल्याने गणेश गिते हे माघार घेत आहे. मात्र, त्यांचे बंधू गोकूळ गिते आजून निवडणूकीवर ठाम आहेत. त्यांच्याही समजूत काढण्याचे प्रयत्न महाजन यांच्याकडून केले जात आहेत. जळगाव, नाशिक कुठेही बंडखोरी राहणार नाही, सगळे माघार घेतली असा विश्वास महाजनांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.