Jalgaon Mayor Deepmala Kale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon MC : महापौर पदाच्या खुर्चीवर बसताच दीपमाला काळे अॅक्शन मोडवर, प्रशासकीय काळातील कामांचा मागितला हिशोब

Jalgaon Mayor Deepmala Kale : महापालिकेत प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर गेल्या अडीच वर्षांच्या कामांची माहिती भाजपच्या महापौर दीपमाला काळे व जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी मागवली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Municipal Corporation : महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे. महापालिकेत नवीन महापौर, उपमहापौर तसेच त्यापाठोपाठ स्थायी समिती सभापतींची निवड प्रक्रिया देखील पार पडली आहे. त्यानंतर आता महापौर दीपमाला काळे यांच्यासह माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा हे अॅक्शन मोडवर आले असून अडीच वर्षांच्या प्रशासकीय काळातील कामांची माहिती त्यांनी मागवली आहे.

२१ सप्टेंबर २०२३ पासून म्हणजे अडीच वर्ष महापालिकेत प्रशासकराज होते. महापालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून आयुक्तांकडे प्रशासक म्हणून कार्यभार होता. सभागृहाची मुदत संपल्यापासून नंतरचे जवळपास वर्षभर विद्या गायकवाड आयुक्त व प्रशासक म्हणून होत्या. तर गेल्या दीड वर्षांपासून विद्यमान आयुक्त ज्ञानेश्‍वर ढेरे यांच्याकडे प्रशासकपदाची जबाबदारी होती.

प्रशासकीय काळात झालेल्या महासभांसह स्थायी समितीच्या सभांमध्ये सादर व मंजूर करण्यात आलेले विषय कोणते, या विषयांची अंमलबजावणी कशा पद्धतीने व किती प्रमाणात झाली, या कार्यकाळात मंजूर कामे, त्यापैकी किती कामे झाली, त्यावरील खर्च अशी विस्तृत माहिती महापौर दीपमाला काळे यांच्यासह नितीन लढ्ढा यांनी मागवली आहे. (Jalgaon News)

सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२६ अशा अडीच वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळात अनेक प्रकारचे ठराव, विषय मंजूर करण्यात आले. महासभा व स्थायी समितीच्या सभांमधून हे ठराव व कामे मंजूर झाली. शहरात यादरम्यान झालेल्या कामांवर तसेच प्रशासकीय खर्च व अन्य स्वरुपाच्या माध्यमातून कोटींचा खर्च झाला. नगरसेवक अथवा पदाधिकारी कार्यरत असल्याने या एकूणच अडीच वर्षांतील मंजूर कामे, ठराव यासंबंधी माहिती ही माध्यमे अथवा जनतेसमोर आलेली नाही.

या कामांबाबत सविस्तर माहिती मिळावी यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी नगरसचिवांना पत्र पाठवले आहे. तसेच, नितीन लढ्ढा यांनीही हीच माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करत प्रशासनाकडे पत्र दिले आहे. या माहितीद्वारे प्रशासनाने आतापर्यंत नेमकी कोणती कामे केली, काय निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी कितपत झाली याचा संपूर्ण आढावा समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT