Chhagan Bhujbal : फडणवीस आले तोडगा काढू म्हणाले, आता भुजबळ त्यांच्या मागेच लागले; कांदा प्रश्नावर दबाव वाढवला

Nashik onion price crisis : कांद्याच्या दराबाबत कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता असून त्यातूनच नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचा ताफा अडवत आंदोलन करण्याची योजना काल काही लोकांनी केली होती.
devendra fadnavis chhagan bhujbal
devendra fadnavis chhagan bhujbalsarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : कांद्याचे घसरलेले भाव, सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्लॅन केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांची गाडी पुढे निघून गेल्याने त्यांची योजना फसली.

नाशिकमध्ये आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आले होते. भाषणावेळी त्यांनीच यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, काही लोकांनी माझी गाडी अडविण्याचे ठरवले होते. मात्र दुर्दैवाने माझी गाडी पुढे निघून गेली. "तुमची क्षमा मागतो तुम्ही माझी गाडी आडवू शकला नाही. मात्र तुमचा प्रश्न महत्वाचा आहे. कांदा प्रश्न महत्वाचा असून त्यावर लवकरच बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असे आश्वासन जाता जाता भाषणाच्या शेवटी फडणवीसांनी दिले.

दरवर्षी आपण या प्रश्नावर तोडगा काढतो तसा याहीवर्षी काढू, त्यासाठी बैठक घेऊ असे फडणवीस यांनी आश्वासन दिले. त्यानंतर शनिवार (दि. २८) अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगेच याचा पाठपुरावा सुरु केल्याचं दिसत आहे. भुजबळांनी कांदा प्रश्नावर फडणवीस यांना पत्र लिहलं आहे.

devendra fadnavis chhagan bhujbal
Devendra Fadnavis : "तुमची क्षमा मागतो, तुम्ही माझी गाडी अडवू शकला नाही;" फडणवीस नाशिकमधून जाता जाता नेमकं काय म्हणाले?

कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत असून नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अतिशय चिंतेत आहे. कांद्याच्या प्रश्नांवर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत असून कांद्याच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक कांदा उत्पादन करणारा जिल्हा असून येथील हजारो शेतकऱ्यांदा कांदा पिकावर उदरनिर्वाह अवलंबून आहे. कांदा दरातील चढ-उताराचा थेट परिणाम नाशिक जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांवर होत असतो. राज्यातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत.

devendra fadnavis chhagan bhujbal
Nashik NMC : प्रशासकीय काळातील चार वर्षांच्या कारभाराची फाईल उघडा ! सत्तेच्या खुर्चीत बसताच शिवसेना आक्रमक मोडमध्ये

जानेवारी महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव प्रतिक्विंटल सुमारे १,००० रुपयांच्या आसपास स्थिरावले होते. आता तर त्यापेक्षाही कमी दर मिळत आहेत. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अत्यंत अपुरा व तोट्याचा आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे कांद्याच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी बैठक आयोजीत करण्यात यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com