Jalgaon Municipal Corporation Election 2026 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Mayor 2026: जळगाव महापालिकेच्या चाव्या भाजपाकडे; उद्धव ठाकरेंची शिवसेना उरली नावाला!

Jalgaon Municipal Corporation election results 2026 winner list: जळगाव महापालिकेत स्थायी समितीवर भाजप आणि शिंदे सेनेचा संपूर्ण कब्जा.

Sampat Devgire

BJP wins Jalgaon Municipal Corporation with a clear majority: जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने भरघोस यश मिळवले. त्याचे राजकीय पडसाद महापालिकेच्या कारभारावर उमटले आहेत. त्यामुळे जळगाव महापालिकेच्या कारभारत विरोधक केवळ नावाला उरले आहेत.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्व ४६ अर्थात १०० टक्के नगरसेवक निवडून आले. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे ९० टक्के नगरसेवक निवडून आले. त्यामुळे भाजपच्या दीपमाला काळे महापौर तर शिवसेना शिंदे पक्षाचे मनोज चौधरी उपमहापौर झाले.

आता जळगाव महापालिका स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यासंदर्भात महापौर काळे यांनी महासभेची तारीख जाहीर केली आहे.

जळगाव महापालिकेच्या आर्थिक कारभाराच्या चाव्या स्थायी समितीच्या सदस्यांच्या हाती पडणार आहेत. त्यामध्ये सध्या तरी १६ पैकी १५ जागा सत्ताधारी पक्षाकडे असतील. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला विरोधक म्हणून अवघी एक जागा मिळणार आहे.

महापालिकेच्या एकूणच कारभारावर आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यात महत्त्वाचे आणि आर्थिक निर्णय होणाऱ्या स्थायी समितीतही विरोधक नावालाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शहराच्या कामकाजात नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी विरोधक शिल्लकच राहिला नाही.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत नागरिकांनी दिलेला हा कौल त्यामुळेच चर्चेचा विषय बनला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी नगरपालिका आणि अन्य सत्ताकेंद्र भाजपाने आपल्या ताब्यात ठेवली आहे. त्यात महत्त्वाची महापालिका देखील पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेल्याने राजकीय दृष्ट्या विरोधकांना बॅकफूटवर जावे लागले आहे.

यासंदर्भात येथे सोमवारी स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्याकरता महासभा होईल. त्यात १६ सदस्यांच्या समितीत भाजपचे १०, शिवसेना शिंदे पक्षाचे पाच आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा अवघा एक सदस्य निवडला जाईल. महिला आणि बालकल्याण समितीतही हीच स्थिती आहे. येथेही विरोधकांचा अवघा एक सदस्य असेल. त्यामुळे जळगावच्या कारभारात आता विरोधक नावालाच शिल्लक राहिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT