Onion Farmers Crisis 2026: खासदार बोलले, पण संसदेच्या गदारोळात कांदा उत्पादकांचा आवाज सरकार ऐकणार का?

Impact of Parliament ruckus on onion export policy 2026: पुन्हा एकदा कांद्याचे भाव गडगडल्याने महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे.
Demand for stable export policy by Maharashtra MPs in Parliament
Demand for stable export policy by Maharashtra MPs in ParliamentSarkarnama
Published on
Updated on

Bhaskar Bhagre News: संसदेत एपस्टीन फाईल आणि भारत अमेरिका व्यापार करार यावरून  गदारोळ सुरू आहे. या प्रश्नावर विरोधकांनी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केल्याने भाजप अडचणीत आहे. यामध्ये सर्वच प्रश्न बाजूला पडल्याचे चित्र आहे.

सध्या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचा प्रश्न तीव्र बनला आहे. कांद्याचे दर ७०० ते ८०० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी हताश बनला आहे. केंद्रातील भाजप सरकारकडे त्यांचे डोळे लागले आहेत.

या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. धुळ्याच्या काँग्रेसच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांनीही वाणिज्य सचिवांची भेट घेतली. कांदा प्रश्नावर सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली.

Demand for stable export policy by Maharashtra MPs in Parliament
Nashik MNS : खाजगी कोचिंग क्लासमधील राडा भोवला; नाशिक पोलिसांची मोठी अॅक्शन, मनसेच्या 5 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

संसदेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी सरकार बॅकफूटवर गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणावर विरोधक आणि सत्ताधारी संघर्ष करीत आहेत. यामध्ये अनेक महत्त्वाचे प्रश्न राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात हरवून गेले.

Demand for stable export policy by Maharashtra MPs in Parliament
Narhari Zirwal News: राज्यातील तीन शहरात उभारणार ‘इन्क्युबेशन पार्क’, ‘फार्मा पार्क’; आदिवासी भागात 300 आयुर्वेदिक दवाखाने

खासदार भगरे यांनी गेल्या वर्षी मे महिन्यापासून झालेल्या सततच्या बेमोसमी पावसाने कांदा पिकाची हानी झाली. शेतकरी संकटात सापडला आहे. कांदा उत्पादकांना मोठी आर्थिक झळ बसली आहे. याकडे लोकसभेत शासनाचे लक्ष वेधले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. सरकारने याबाबत हस्तक्षेप करून दर सावरण्यासाठी मदत करावी. त्याचे दर शेतकऱ्यांना खर्चही भागवणारे नाहीत, असे खासदार भगरे यांनी सांगितले.

काँग्रेसच्या खासदार डॉ बच्छाव यांनी केंद्रीय सचिव आर. व्ही. सोमनाथन यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला. त्यांना निवेदन दिले. कांद्याच्या सध्याचा उत्पादन खर्च दीड हजार रुपये आहे. मिळणारा भाव सातशे ते आठशे रुपये प्रती क्विंटल आहे. या स्थितीत सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही तर परिस्थिती गंभीर होईल, असे त्यांनी सांगितले.

कांद्याचे दर कमी झाल्याने राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. या संदर्भात विविध संघटनांनी आंदोलन केले आहे. सरकारला इशारा देण्यात आला आहे. मात्र संसदेतील गदारोळामध्ये कांदा उत्पादकांचा प्रश्न कितपत गांभीर्याने घेतला जातो, हा चर्चेचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com