Ajit Pawar & Abhishek Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: खिंडीत सापडलेल्या अजित पवारांच्या पक्षात स्फोट; २२ लाखाला उमेदवारी विकली, आरोपांचा धुरळा अन् जिल्हाध्यक्षांनी पक्ष सोडला!

Jalgaon NCP Ajit Pawar municipal election settlement, district president Abhishek Patil resigns -अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जळगावच्या शहराध्यक्षांनीच केला नेत्यावरच सेटलमेंटचा आरोप केल्याने खळबळ

Sampat Devgire

Jalgaon NCP News: जळगाव महापालिकेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला एकटे पाडले. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच जोरदार आरोप, प्रत्यारोप होत आहेत. त्याचा मोठा फटका पक्षाला बसला आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला खिंडीत गाठले. यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही राष्ट्रवादीची कोंडी केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर पक्षातूनच गंभीर आरोप होऊ लागले आहेत.

या घडामोडीत अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अभिषेक पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.

जळगाव महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा उमेदवार नाही. त्याला पक्षाचे सेटलमेंट करणारे नेते कारणीभूत आहेत. पक्षातील एका माजी मंत्र्यांवर याबाबत गंभीर आरोप करीत शहराध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.

हे करताना शहराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. महायुतीच्या जागा वाटपात पक्षाला सहा जागा देण्यात येणार होत्या. मात्र यातील चार जागांवर भाजपच उमेदवार देणार होते. यातील एक जागा मिळणार होती. ती पक्षाच्या नेत्यांनी २२ लाख रुपयांमध्ये सेटलमेंट करून विकली अशी चर्चा असल्याचा गंभीर आरोप शहराध्यक्षांनी केला आहे.

जळगाव महापालिकेच्या सर्व ७५ जागांवर उमेदवार देण्याची आपली तयारी होती. भाजपने २२ माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी घेण्यास तयार होते. मात्र पक्षातीलच नेत्यांनी त्यात अडथळा आणला, असा दावा शहराध्यक्ष पाटील यांनी केला.

यासंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांऐवजी स्थानिक नेत्याला महत्त्व देतात. तो सांगेल तेच पक्षात होत असते. काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष कोणतीही किंमत नाही.

पक्षाकडे तक्रार करून देखील काहीही उपयोग होणार नाही. आम्ही गेले अनेक वर्ष पक्षात मेहनत घेऊन आणि खिशातून पैसे खर्च करून पक्ष वाढवला. त्याची पक्षाच्या नेत्यांना काहीही महत्व नाही. त्यामुळे आपण पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

पाटील यांनी पक्षाचे नेत्यांवर केलेल्या गंभीर आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात जळगाव मध्ये सेटलमेंट करणारा नेता कोण? पक्षाच्या वाट्याला आलेली जागा भाजपच्या आमदाराच्या पत्नीला विकणारा नेता कोण? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT