BJP politics : ठाकरेंचा उमेदवार पळवताच, शिंदे शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनाचाही रंग उडाला; धुरंधर भाजपनं जळगावमध्ये नेमकी काय खेळी खेळली?

Jalgaon Municipal Election BJP Fields ShivSenaUBT Candidate, Weakens Eknath Shinde MLA Kishor Patil Show of Strength : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपने अखेरच्या क्षणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचा उमेदवार पळवल्याने खळबळ उडाली आहे.
MLA Kishor Patil
MLA Kishor PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Municipal Corporation election : जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपच्या धुरंधर राजकीय खेळीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी शिवसेना ठाकरे सेना पक्षाला टार्गेट करताना, जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज भरण्याची तयारी केली. परंतु भाजपने ऐनवेळी धुरंधरपणा दाखवत, शिवसेना ठाकरे पक्षाचा उमेदवार पळवला. भाजपच्या या खेळीच्या चर्चेने शिवसेना ठाकरे पक्षाला धक्का बसलाच, पण एकनाथ शिंदे शिवसेनेकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनाचाही रंग उडाला.

जळगाव (Jalgaon) महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेत मंगळवारी शेवटच्या तासात नाट्यमय घडामोडी घडल्या. प्रभाग क्रमांक दोनमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाकडून विजय बांदल यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर दुसरीकडे युती अंतर्गत एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाकडून संतोष पाटील यांनी उमेदवार अर्ज दाखल केला होता.

संतोष पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरताना पाचोरा इथले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे आमदार किशोर पाटील स्वतः उपस्थित राहून मोठे शक्तिप्रदर्शन केले. मात्र, या सगळ्या घडामोडींना उलटवून भाजपने शेवटच्या क्षणी आपली राजकीय खेळी केली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या एक तास आधीच विजय बांदल यांना भाजपकडून उमेदवारी दिली.

MLA Kishor Patil
BJP internal conflict : फिल्डिंग लावून पत्ता कट, भाजप इच्छुक उमेदवार संतापला; किशोर जोरगेवारांचं दहा वर्षांपूर्वीचं 'फॉर्महाऊस कांड' काढून बसला

भाजपच्या धुरंधर राजकीय खेळीने महापालिका निवडणुकीतील वेगळ्याच चर्चांना उधाण सुरू झालं. भाजपच्या या राजकीय धक्काने परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे जिल्हाप्रमुख व महानगरप्रमुख देखील दुसऱ्या उमेदवाराला एबी फॉर्म देण्यासाठी अर्धा तास बाकी असताना महापालिका कार्यालयात घाई गडबडीत आले. तोपर्यंत भाजपने डाव साधला होता. त्याआधीच भाजपने विजय बांदल यांना उमेदवारी देऊन संपूर्ण समीकरण बदलून टाकले.

MLA Kishor Patil
Bhagwan Fulsundar joins NCP : फुलसौंदरांचा ठाकरेंना 'जय महाराष्ट्र'; भाजप-राष्ट्रवादीच्या 12 माजी नगरसेवकांना डिच्चू, बंडखोर शिंदे शिवसेनेच्या गळाला

या नाट्यमय घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक दोनमध्ये राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, पक्षांतर्गत नाराजी आणि शेवटच्या क्षणी झालेल्या उलटफेरीमुळे निवडणुकीच्या रणधुमाळीला नवा रंग मिळाला आहे. भाजपने केलेल्या या राजकीय खेळीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, तर एकनाथ शिंदे शिवसेनेने दाखवलेल्या शक्तिप्रदर्शनाचाही रंग उडाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com