Former Minister Dr. Satish Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News: माजी मंत्र्याने गटविकास अधिकाऱ्यांना झापले! काय आहे प्रकरण?

Former Minister Dr. Satish Patil: पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी गैरहजर असल्याचे आढळले. त्यामुळे डॉ. सतीश पाटील यांचा पारा चढला. त्यांनी संताप व्यक्त करीत येथूनच अधिकाऱ्यांना फोन करुन त्यांना चांगलेच झापले.

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी दांडीबहादर गटविकास अधिकारी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पारोळा येथील पंचायत समिती कार्यालयात माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अचानक भेट दिली. यावेळी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांसह अनेक अधिकारी गैरहजर असल्याचे आढळले.

डॉ. सतीश पाटील यांचा पारा चढला. त्यांनी संताप व्यक्त करीत येथूनच अधिकाऱ्यांना फोन करुन त्यांना चांगलेच झापले. पारोळा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच , अनेक लाभार्थी, शेतकरी यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेचे कामे सुरु केली आहेत.

घरकुल , सिंचन , गोठा शेड बांधणे , कृषी विभागातील अनेक कामाचे प्रस्ताव आर्थिक देवाणघेवाणीमुळे प्रलंबित असल्यामुळे पाटील यांच्याकडे त्यांनी तक्रारीचा पाढा वाचला. त्यानंतर सतीश पाटील यांनी त्यांची तत्काळ दखल घेऊन पंचायत समिती गाठली .

पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी किशोर शिंदे , यांच्यासह अनेक अधिकारी गैरहजर असल्याचे आढळले. गटविकास अधिकारी यांच्या दालनातूनच जळगांवचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांना फोनद्वारे अनेक कामे प्रलंबित असून येत्या काही दिवसात आचारसंहिता लागणार असल्याने लाभार्थ्यांची कामे कधी होणार असा प्रश्न त्यांनी विचारला.

येथे अधिकारी नसेल तर त्यांचा पदभार दुसऱ्या अधिकाऱ्यांना देऊन लाभार्थ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा येईल, असा इशारा सतीश पाटील यांनी दिला. यावेळी बाजार समिती संचालक, सरपंच, उपसरपंच लाभार्थीसह शेतकरी आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT