Suresh dada Jain Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sureshdada Jain Breaking : जळगावात ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत सुरेशदादा जैन यांचा 'हा' मोठा निर्णय

Suresh dada Jain: माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन 1974 पासून ते सतत राजकारणात होते. 1980 पासून सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते जवळपास 34 वर्ष आमदार होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रीपद दिलं होतं.

कैलास शिंदे

Suresh dada Jain: माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन (Suresh dada Jain) यांनी 8 मे 2024 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला आहे. शिवाय आता इथून पुढे आपण सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे. इथून उर्वरित आयुष्यात राजकारणात कोणताही सहभाग घेणार नसल्याचंही त्यांनी ठरविलं आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत जैन यांनी सक्रिय राजकारणातून घेतलेला संन्यास चर्चेचा विषय ठरला आहे.

माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन (Suresh dada Jain) 1974 पासून ते सतत राजकारणात होते. 1980 पासून सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर ते जवळपास 34 वर्ष आमदार होते. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रीपद दिलं होतं. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कामाचा आढावा घेतला होता. ज्यामध्ये जळगाव शहराचा सर्वांगिण विकास, विशेषत: बीओटी तत्त्वावर बांधलेले संकूल, गोरगरिबांसाठी घरे यावर ते प्रभावित झाले होते. जैन यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळाच ठसा उमटविला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामध्ये जिल्हा बँक, दूध विकास, मिनी मंत्रालय, साखर कारखाने अशा विविध क्षेत्रात जिल्ह्याचे विकासाचे व्हिजन, शेतकरी व सामान्य जनतेला हे केंद्रस्थानी ठेवून त्यांनी कामे केली होती. तर 2014 सालापासून ते प्रकृतिच्या कारणामुळे राजकारणापासून लांब राहिले होते. जरी ते राजकारणापासून लांब असले तरी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप आदराची भावना आहे.

दरम्यान, जैन यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असली तरी राष्ट्राच्या, राज्याच्या, जिल्ह्याच्या व आपल्या जळगाव शहराच्या सर्वांगिण विकासासाठी ते मार्गदर्शक भूमिकेतच राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच त्यांनी आपला निर्णय जाहीर करताना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन समस्त शिवसैनिकांबद्दल प्रेम व आदरही व्यक्त केला.

राजकीय स्थिती फारशी उत्साहवर्धक नाही

तर सुरेशदादा जैन यांनी मागील वर्षीच राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करत मोठं विधानं केलं होतं. ते म्हणाले होते, आपण सामाजिककार्याच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहोत, राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहोत. भविष्यात आपल्या घरातील कोणीही वारसदार म्हणून राजकारणात येण्याची शक्यता नाही. आजची राज्यातील राजकीय स्थितीही फारशी उत्साहवर्धक नसल्याचं मतं त्यांनी व्यक्त केलं होतं.

(Edited By Jagdish Patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT