BJP Vs Sharad Pawar : 'हिंदू दहशतवाद आणण्याचं पाप शरद पवारांचं...'; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Sunil Deodhar : मालेगाव मशिदीबाहेर बॉम्बस्फोट झाला त्यावेळी एक गोष्ट समोर आली होती, की सगळे मुस्लिम दहशतवादी नाहीत; पण सापडलेले सगळे दहशतवादी मुस्लिम कसे?
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Maharashtra Political News : नाशिक जिल्ह्यातील मालेगावातील एका मशिदीजवळ 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यात सहा लोकांचा मृत्यू तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट हिंदू लोकांनी घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरून भाजप नेते सुनील देवधर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या बॉम्बस्फोट Malegaon Bomb Spot प्रकरणात पवारांनी सहभागी नसलेल्या हिंदूंना गोवले. तसेच त्या प्रकरणी मला अडकवण्याचाही प्रयत्न झाल्याचे देवधर म्हणाले.

या प्रकरणी खटल्याची सुनावणी विशेष न्यायालयात सुरू असून ती अंतिम टप्प्यात आहे. यातील आरोपींचे जबाब नोंदवले जात आहेत. यात आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी जबाबाबत तत्कालीन सरकारने छळ केल्याचा आरोप केला आहे. यावर सुनील देवधर Sunil Deodhar यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांना धारेवर धरले आहे. मालेगाव मशिदीबाहेर बॉम्बस्फोट झाला त्यावेळी एक गोष्ट समोर आली होती, की सगळे मुस्लिम दहशतवादी नाहीत; पण सापडलेले सगळे दहशतवादी मुस्लिम कसे? असा प्रश्नही देवधर यांनी उपस्थित केला आहे.

देवधर म्हणाले, अलिबागमधे तत्कालीन राष्ट्रवादीची चिंतन बैठक झाली होती. त्यात सभेत शरद पवारांनी Sharad Pawar मशिदीबाहेर मुस्लिम कसा बॉम्बस्फोट कसा करू शकतो, असे विधान केले होते. त्यानुसारच पुढील तपास करायला लावला. पवारांच्या या विधानाने मग देशभरात तो नरॅटिव्ह तयार करण्यात आला. त्यातूनच बॉम्बस्फोट प्रकरणी हिंदू दहशतवाद आणण्याचे पाप शरद पवारांनी यांनी केले. त्यांना हिंदू कधीही माफ करणार नाही, असा इशाराही देवधर यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sharad Pawar
Narendra Dabholkar Case : तब्बल 10 वर्षांनंतर नरेंद्र दाभोलकरांना न्याय मिळणार? उद्या निकाल

प्रामाणिकपणे हिंदुत्वासाठी Hindu काम करतात, अशा लोकांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गोवण्याचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी केले आहे. त्या प्रकरणात आरोपी म्हणून घेतलेली चारही नाव शरद पवार यांनीच घ्यायला लावली होती. त्यात सुनील देवधर यांचे नाव घेण्यासाठी दबाव आणला होता, असे कर्नल पुरोहित यांनी सांगितल्याचा दावाही देवधर यांनी केला. मात्र हिंदुत्वाबाबत मी कधीही तडजोड केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Sharad Pawar
Political News : 'गद्दार' शब्दाचा महिमाच अपार...तिघींची झुंज अन् राजकीय संकेतांची ऐशीतैशी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com