Jalgaon News : जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याने फेसबुकवर पश्चिम बंगालच्या तरुणीशी थेट संपर्क साधला. काही काळ मैत्री ठेवून, प्रेमाचे खोटे आश्वासन देत तिला जळगावात बोलावून लग्नाचे वचन दिले. पीडितेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शरीर संबंध ठेवले, तसेच गुन्हा दाखल होऊ नये यासाठी खोटे लग्न करुन तिला फसवलं व त्यानंतर तिला पिटाळून लावलं. याबाबत पोलिस कर्मचारी नितीन कमलाकर सपकाळे यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पश्चिम बंगालची मुमताज (काल्पनिक नाव) ही खासगी कंपनीत काम करणारी महिला आहे. फेसबुकवर सक्रिय असल्यामुळे ती २०१७ मध्ये जळगावच्या पोलिस नितीन सपकाळे यांच्या संपर्कात आली. यानंतर दोघांमध्ये चॅटद्वारे संवाद सुरू झाला.
नितीन सपकाळेने तरुणीला सांगितले की तो पोलिस असून अविवाहित आहे. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली. “मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही” अशी भावना व्यक्त झाल्यानंतर, मुंबईत नोकरी करणारी महिला प्रेमासाठी जळगावात आली. ती हॉटेलमध्ये राहिली. नितीनने तिला खात्री दिली की दोघांचे लग्न होणार आहे. नितीनने तिला विविध हॉटेलमध्ये नेऊन शरीरिक संबंध ठेवले. २०२० मध्ये एका हॉटेलमध्ये थांबलेले असताना तिने नितीनचा मोबाइल तपासला आणि त्याच्यासोबत दुसरी महिला आणि लहान मुलगी असल्याचे उघड झाले. त्यावर नितीनने सांगितले की तो घटस्फोट प्रक्रियेत असून, घटस्फोट मिळताच लग्न करणार आहे. या कबूलीनंतरही अत्याचार सुरु होते.
२०२१ ते २०२५ यादरम्यान नितीन सपकाळे याने पीडितेवर अत्याचार केले. पीडितेने लग्नाची इच्छा व्यक्त केली त्यावरुन दोघांमध्ये वाद झाले. नितीन सपकाळे याने लग्नास स्पष्ट नकार दिला. त्याने पीडित आपली फसवणूक झाल्याचे कळताच पीडितेने कायद्याची मदत घेतली. फेब्रुवारी २०२५ ते सप्टेंबर असे तब्बल सात महिने पीडिता पोलिसांत तक्रार देण्यासाठी या पोलिस ठाण्यातून त्या पोलिस ठाण्यात फिरत होती. मात्र, तिची तक्रारच दाखल होत नसल्याचे तिने सांगितले. अखेर एका ज्येष्ठ वकिलाची मदत घेतल्यानंतर जळगाव पोलिसांना तिची तक्रार घ्यावी लागली.
आपल्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण अडचणीत येऊ हे लक्षात येताच पोलिस कर्मचारी नितीन सपकाळे, त्याची आई आणि पत्नी यांनी पीडितेला पैशांचे आमिष देत तक्रार न करण्याची विनवणी केली. धमक्याही दिल्या. परंतु ऐकतच नसल्यानेपीडितेला जिल्हा न्यायालयाजवळ नेऊन १५ मे २०२५ ला अॅड. जयंत मोरे, अॅड. दीपक देवळे यांनी तयार केलेल्या संमती पत्रावर सह्या करवून घेतल्या. त्यानंतर भुसावळ रोडवरील वैष्णोदेवी मंदिरात नेऊन दीक्षित पंडितामार्फत लग्न लावून घेतले. फोटोसेशन झाले. त्यानंतर नितीन याने दुचाकीवर बसवून नेत मैत्रीणीच्या घरी सोडून निघून गेला. फोन केला असता, त्याने 'आपले कोणतेही लग्न झालेले नाही, तू तुझ्या घरी निघून जा', असे म्हणत टाळाटाळ केली.
फसवणूक करून संमतीपत्रावर सह्या घेऊन खोटे लग्न लावून घेतल्याचे कळाल्यावर पीडितेने पुन्हा पोलिसांत धाव घेतली. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस कर्मचारी नितीन सपकाळे, त्याची पत्नी व आईविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सागर शिंपी, सहाय्यक निरीक्षक दीपक सुरवळकर तपास करीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.