Jalgaon NCP News : PM मोदी अन् अमित शाहंकडे केली होती तक्रार; अखेर जळगावातील राष्ट्रवादीच्या नेत्याला बेड्या

Jalgaon NCP Ajit Pawar leader arrest : राजकीय दबावापोटी पोलिस अटक करत नाही असा ओराप व्यावसायिक मनोज वाणी यांनी पत्रकारपरिषद घेत केला होता. पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी अटकेची मागणी केली होती.
NCP Vinod Deshmukh arrested
NCP Vinod Deshmukh arrestedSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon political news : जळगावचे व्यावसायिक मनोज वाणी यांच्या ऑफीसमध्ये जबरदस्तीने घूसुन हल्ला करत दरोडा टाकून तसेच जीवे मारण्याची धमकी देत 1 लाख 14 हजारांचा ऐवज बळजबरीने घेऊन गेल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा माजी पदाधिकारी विनोद देशमुखविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल होता. 12 नोहेंबर 2022 ला त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र जवळपास तीन वर्ष झाली तेव्हापासून तो फरार होता. अखेर संशयित देशमुखला रामानंदनगर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अटक केली.

विनोद देशमुखला बुधवारी (दि. २४ सप्टेंबर) न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यासह या गुन्ह्याच्या तपाससाठी जिल्हा न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात विनोद देशमुखला तीन वर्षांनी अटक झाल्याने पुढे आता नेमकी काय कारवाई केली जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

व्यावसायिक मनोज वाणी यांनी पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून तक्रार केली होती त्यात जिल्हा प्रशासनावर गंभीर आरोप केले होते.

NCP Vinod Deshmukh arrested
Nashik Kumbh Mela : एकीकडे राजकीय पक्षांमध्ये चढाओढ, दुसरीकडे पोलिस महासंचालक रश्मी शुक्लाही उतरल्या कुंभ आखाड्यात

जिल्हा सत्र न्यायालय व औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन फेटाळून देखील विनोद देशमुखला अटक केली नाही. तो गावात मुक्तपणे फिरत होता. विनोद देशमुखने स्वत:ला अजित पवार यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत पोलिस व शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप वाणी यांनी पत्रकारपरिषदेत केला होता. देशमुख याच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही पोलिसांनी राजकीय दबावापोटी त्याला अटक केली नाही असा आरोप वाणी यांनी केला होता. विनोद देशमुखला अटक करुन याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी वाणी यांनी पत्राद्वारे पत्रकार परिषदेत केली होती.

NCP Vinod Deshmukh arrested
Girish Mahajan Politics : नाशिकच्या कुंभमेळ्यात दुसऱ्या गिरीश महाजनांची 'एंट्री', स्थानिक नेत्यांची अस्वस्थता वाढली

नेमकं काय घडलं होतं?

व्यावसायिक मनोज वाणी यांच्या रामदास कॉलनीतील कार्यालयावर ३१ ऑक्टोबर २०२२ ला संशयित देशमुखसह साथिदारांनी हल्ला करून बळजबरीने काही साहित्य, धनादेश असा ऐवज घेऊन गेले. जीव घेण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी १२ नोव्हेंबर २०२२ ला रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर अखेरीस तब्बल तीन वर्षांनी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी रात्री देशमुखला अटक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com