Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : पुतण्याकडून काकांना दुसरा धक्का देण्याची तयारी, जळगावात घेणार पक्षप्रवेशाचा दुसरा टप्पा

Ajit Pawar's New Political Strategy in Jalgaon : सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार व शरद पवार यांचा गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र अशातच आता अजित पवार यांनी शरद पवार यांना आणखी दुसरा धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यात दोन माजी मंत्र्यांसह दोन माजी आमदार यांच्यासोबत अनेक तोलामोलाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांचे घड्याळ हाती बांधले आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर आल्या असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठी हानी झाली आहे.

सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार व शरद पवार यांचा गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहे. मात्र अशातच आता अजित पवार यांनी शरद पवार यांना आणखी दुसरा धक्का देण्याची तयारी सुरु केली आहे. गेल्याच आठवड्यात अजित पवार यांनी शरद पवार गटातील जिल्ह्यातील मात्तबर नेते गळाला लावल्यानंतर आता पुन्हा जळगावात पक्षप्रवेशाचा दुसरा टप्पा घेण्याची तयारी सुरु असून त्यात शरद पवार गटातील काही बडे नेते येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

येत्या काही दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्हा मेळाव्यादरम्यान हा प्रवेश होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. यात शरद पवार गटातील उरले सुरले अनेक स्थानिक पदाधिकारी व काही बडे नेते अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. नेमका कोणत्या नेत्यांचा पक्षप्रवेश होऊ शकतो याची अधिकृत नावे समजू शकलेली नसली, तरी १४ मे रोजी राज्यातील शरद पवार गटातील काही बड्या नेत्यांची बैठक होणार असून, या बैठकीनंतरच अधिकृत नावे देखील समोर येणार आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात माजी मंत्री सतीश पाटील व गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, विधान परिषदेचे माजी सदस्य दिलीप सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. अनेक मात्तबर पक्ष सोडून गेल्याने पक्षाची मोठी हानी झाल्याची कबुलीच जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी दिली. अशातच अजित पवारांचा जिल्ह्यातील पक्षप्रवेश करुन घेण्याचा हा दुसरा टप्पा यशस्वी झाल्यास शरद पवार गटाचे उरले सुरले सगळे आवसान गळून पडणार आहे.

एकनाथ खडसे, त्यांच्या कन्या रोहिणी खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, अमळनेरचे माजी आमदार डॉ. बी.एस पाटील, उद्योजक श्रीराम पाटील असे बरेच दिग्गज अजूनही शरद पवार गटात आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या पक्षप्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्यात यातील काही नेत्यांचा समावेश असेल का? हे पाहण्यासाठी राजकीय वर्तुळात उस्तुकता आहे.

दरम्यान अजित पवार गटात जायचे असते, तर ज्यावेळ राष्ट्रवादीत दोन गट पडले त्याचवेळी गेलो असतो. सध्यातरी असा कोणताही निर्णय नाही. मी शरद पवार यांच्यासोबत आहे. इतर कुणी अजित पवार गटात जाणार आहेत किंवा नाही याबाबत माहिती नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT