Girish Mahajan : गिरीश महाजनांची बदनामी भोवली, अनिल थत्ते यांना न्यायालयाचा झटका ; सर्व व्हिडीओ हटवण्याचे आदेश

Girish Mahajan Defamation, Anil Thatte Video Case, Court Order : पत्रकार अनिल थत्ते यांनी एका व्हिडीओमध्ये भाजप नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला होता. महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे थत्ते यांनी म्हटलं होतं
Girish-Mahajan-Eknath-Khadse.jpg
Girish-Mahajan-Eknath-Khadse.jpgSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan Defamation : पत्रकार अनिल थत्ते यांनी एका व्हिडीओमध्ये भाजप नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला होता. महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचे थत्ते यांनी म्हटलं होतं. याच आरोपांचा दाखला देत राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनीही महाजन यांच्यावर टीका केली होती.

अनिल थत्ते यांनी केलेल्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे व पत्रकार अनिल थत्ते या दोघांच्याही विरोधात अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली होती. या प्रकणात न्यायालयाने पत्रकार अनिल थत्ते यांना चांगलाच झटका दिला आहे. महाजन यांची बदनामी करणं त्यांना भोवलं आहे. न्यायालयाने थत्ते यांना सोशल मीडीयावरील सर्व व्हिडीओ हटवण्याचे आदेश दिले आहेत.

Girish-Mahajan-Eknath-Khadse.jpg
Jalgaon News : देशासाठी झाले शहीद, जळगावच्या 28 जवानांच्या स्मृती होणार अजरामर ; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

पत्रकार थत्ते यांनी केलेल्या आरोपांचा आधार घेत एकनाथ खडसे यांनीही महाजन यांना टार्गेट केले होते. हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही माहिती आहे, त्यांनी यासंदर्भात महाजन यांना जाब विचारला होता असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला होता. आपणही अमित शहा यांची भेट घेऊन तथ्य काय आहे हे विचारणार असल्याचे खडसे म्हणाले होते.

थत्तेंनी नेमका काय आरोप केला होता?

पत्रकार अनिल थत्ते यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात गंभीर आरोप केला होता. त्यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत असे म्हटले होते. तसेच मला या आयएएस महिला अधिकाऱ्याचे नाव माहिती आहे. मात्र त्यांचे नाव मी घेणे उचित होणार नाही असं म्हटलं होतं. शिवाय माझ्या व्हिडीओतील विधाने सरळ आहेत, ते कार्टात सिद्ध करण्यास आपण तयार असल्याचे थत्ते यांनी म्हटले होते.

Girish-Mahajan-Eknath-Khadse.jpg
Manikrao Kokate Politics: मंत्री झालेले कोकाटे यांची पहिली परीक्षा सिन्नर नगरपालिका निवडणुकीत, काय असेल रणनीती?

महाजन यांनी दिला होता खडसेंना इशारा

दुसरीकडे गिरीश महाजन यांनी खडसे व थत्ते यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईल. कोणालाही तोंड दाखवणार नाही, असे महाजन म्हणाले होते. तसेच मी बोलायला लोगलो तर त्यांना घरातून तोंड काळं करून बाहेर पडावं लागेल. मला बोलायला लावू नका. तुमच्याच घरातील एक गोष्ट सांगितली तर तुमचं बाहेर पडणं अवघड होऊन जाईल, असा इशाराही महाजन यांनी खडसेंना दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com