Jalgaon politics : जळगावच्या राजकारणात एक नवा राजकीय खेळ पाहायला मिळाला आहे. भाजपचे आमदार सुरेश भोळे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपमहापौर आणि सध्या बाजार समितीचे सभापती असलेले सुनील महाजन हे दोन्ही कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. पण जळगावात दोघेही एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यातही विशेष हे की, यावेळी सुनील महाजन यांनी स्वतः आमदार सुरेश भोळे यांचे वाजंत्री लावून जंगी स्वागत केलं. यामुळे जळगावच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
आमदार भोळे आणि महाजन हे दोघेही जळगाव जिल्ह्यातील प्रभावी राजकारणी आहेत. गेल्या काही वर्षांपासून या दोघांमध्ये टोकाचे राजकीय मतभेद असून दोन्ही नेत्यांनी याआधी एकमेकांवर जोरदार टीका केलेली आहे. परंतु जळगावकरांना काल वेगळच चित्र पाहायला मिळालं.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सुरेश भोळे बाजार समिती कार्यालयात गेले असता, तेथे सभापती सुनील महाजन यांनी त्यांचे भव्य स्वागत केलं. अगदी वाजंत्री लावून स्वागत केलं. दोन्ही राजकीय कट्टर विरोधक एकत्र आल्याचं पाहून यावेळी जळगावकरही चकित झाले.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश भोळे यांनी 'राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीतरी वेगळं घडत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. यातून जळगावच्या राजकारणाची समीकरण बदलाची चर्चाही सुरु झाली आहे.
तसेच, गेल्या काही दिवसांपासून सुनील महाजन यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चाही सुरु आहेत. परंतु आमदार सुरेश भोळे यांनी महाजनांच्या भाजप प्रवेशाला उघड-उघड विरोध दर्शविला होता. मात्र आता महाजन यांनी भोळे यांचे केलेलं स्वागत, त्यावर माध्यमांशी बोलताना भोळे यांनी दिलेली प्रतिक्रिया व दोन्ही नेते अशाप्रकारे एकत्र आल्याचे चित्र पाहाता सुनील महाजन यांच्या भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यामागे गिरीश महाजन यांचा सल्ला असल्याचं बोललं जात आहे. जळगावच्या जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं होतं. कुणाच्याही पक्षप्रवेशाला विरोध करु नका असा सल्ला महाजनांनी यावेळी दिला होता. विरोधकांना आपलसं करुन घ्या असं महाजनांनी सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच भोळे - महाजन हे एकत्र एकत्र आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवाय गिरीश महाजन यांच्या माध्यमातून यापूर्वी अनेकांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे सुनिल महाजन यांचाही तसाच प्रवेश होता का ? हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.