Nashik BJP News : संकटमोचक गिरीश महाजन नाशिकमध्ये असतानाच भाजपच्या नेत्यावर 'संकट', गोळीबार प्रकरणात पोलिसांकडून अटक

Nashik shooting case : पंचवटी गोळीबार प्रकरणात पोलिसांनी भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक केली आहे. भाजपच्या माजी नगरसेवकावर झालेली ही दुसरी कारवाई असल्याने भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा आहे.
Jagdish Patil arrested
Jagdish Patil arrestedSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकच्या पंचवटी परिसरात काही दिवसांपूर्वी सागर जाधव या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करत नाशिक पोलिसांनी आता मोठी कारवाई केली असून भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक केली आहे. विशेष म्हणजे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये असतानाच जगदीश पाटील यांना अटक झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंचवटीतील फुलेनगर परिसरात बुधवारी (दि. १७) मध्यरात्री बारा वाजता घराच्या ओट्यावर बसलेल्या सागर विठ्ठल जाधव या युवकावर गोळीबार करण्यात आला होता. सागरला दोन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य आणि टोळीयुद्ध असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अकरा संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. तर दोन आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Jagdish Patil arrested
Bacchu Kadu Politics: बच्चू कडू यांनी आव्हान स्वीकारले, थेट गुलाबराव पाटील यांच्या घरीच जाणार!

दरम्यान आज या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. पाटील यांची वैद्यकीत तपासणी केली जाणार असून त्यासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना नाशिकमध्ये भाजपसमोरील अडचणी वाढत आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच भाजपचे नगरसेवक उद्धव निमसे यांनाही राहुल धोत्रे खून प्रकरणात अटक करण्यात आली होती. ते सध्या कोठडीत आहेत. आता सलग दुसऱ्यांदा पंचवटीत झालेल्या गोळीबार प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्यावर झालेल्या पोलीस कारवाईमुळे भाजप पक्षाची प्रतिमा ढागळल्याची चर्चा सुरु आहे.

Jagdish Patil arrested
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यात पुरोहितांची कमतरता नको, सरकार देणार पौरोहित्याचे प्रशिक्षण

विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर असतानाच भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भाजपच्या दुसऱ्या माजी नगरसेवकावर झालेली ही कारवाई नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com