Minister Girish Mahajan, Gulabrao Patil & Anil Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : गिरीश महाजनांचा जळगावचे पालकमंत्री म्हणून उल्लेख ; गुलाबराव पाटील समोरच उभे, राजकीय चर्चांना उधाण

Jalgaon Guardian Minister Controversy, Girish Mahajan : जळगावचे पालकमंत्री हे गुलाबराव पाटील आहे. परंतु महापालिकेने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात फलकावर मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री असा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Guardian Minister : जळगाव महापालिकेच्या वतीने नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महापालिका प्रशासनाच्या वतीने मोठी चूक झाली. ज्याची जळगावच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

जळगावात १० ऑगस्ट रोजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमस्थळी मंत्री गिरीश महाजनांच्या पदाचा चुकीचा उल्लेख असलेला फलक लावण्यात आला होता. फलकावर जळगावचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजनांचा उल्लेख करण्यात आला होता.

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला जळगावचे पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थितीत होते. जळगावचे पालकमंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील आहेत. ते राज्याचे देखील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत. असे असताना, फलकावर मंत्री गिरीश महाजन यांचा जळगावचे पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

इतकी मोठी चूक महापालिका प्रशासनाकडून झालीच कशी ? असा सवाल आता उपस्थितीत केला जात आहे. यासंदर्भात एका पत्रकारपरिषदेत मंत्री गिरीश महाजन यांना पत्रकारांनी सवाल केला असता त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यावर महाजन म्हणाले, तुम्ही मला त्याच वेळी का विचारलं नाही. कदाचित चुकून झालं असेल. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हेच आहेत, प्रिटिंग मिस्टेक झाली असेल असं स्पष्टीकरण महाजनांनी दिलं.

दरम्यान एकीकडे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास दीड वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र, तरीही अद्याप नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. मंत्री महाजन हे कुंभमेळा मंत्री म्हणून काम बघत असून तेच नाशिकचे अघोषित पालकमंत्री आहेत. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी ते इच्छुक असून त्यांच्या नावाची नेहमी चर्चा असते. मात्र, नाशिकमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना देखील इच्छुक असल्याने हा वाद प्रलंबित आहे.

नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय झालेला नसताना अशाप्रकारे मंत्री गिरीश महाजनांचा उल्लेख जळगावचे पालकमंत्री म्हणून झाल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी देखील नाशिक, रायगड आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. जळगावच्या पालकमंत्रीपदावर त्यांनी राष्ट्रवादीचा दावा सांगितल्याने खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT