Khadse Vs Mahajan  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Khadse Vs Mahajan : खडसेंचा महाजनांवर पलटवार; माझ डोकं ठिकाणावरच, तुम्ही...

Jalgaon Politics News : खडसे यांनी गिरीश महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

कैलास शिंदे

Jalgaon : एकनाथ खडसेंच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्याचा इलाज करावा लागेल," अशी टीका भाजप नेते, राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

"माझं डोकं ठिकाणावरच आहे, म्हणून मी तुम्हाला उत्तर देवू शकत आहे. नांदेड येथे आरोग्य सेवा न मिळाल्याने अनेकांचे बळी गेले, पालकमंत्री म्हणून त्याची जबाबदारी घेवून राजीनामा द्या," असा पलटवार खडसे यांनी महाजन यांच्यावर केला आहे.

खडसे यांनी गिरीश महाजन यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. खडसे म्हणाले, "माझ्या डोक्यावर परिणाम झाला असता तर मी तुम्हाला उत्तर देऊ शकलो नसतो. माझा उपचाराचा खर्च गिरीश महाजन यांनी करण्याइतपत माझी आर्थिक परिस्थिती खराब नाही, मी सधन कुटुंबातून आलो आहे, गिरीश महाजन एका शिक्षकाचा मुलगा जो आज हजारो कोटींची मालमत्ता घेऊन बसला आहे,"

"महाजन काय बोलताहेत त्यापेक्षा जी जबाबदारी त्यांच्यावर आहे, ती त्यांनी सांभाळावी. शेकडो लोक महाराष्ट्रात मरण पावत आहेत, त्याची जबाबदारी स्वीकारा, नांदेड येथे काय झाले त्याची जबाबदारी स्वीकारा, मंत्रिपदाचा राजीनामा द्या ,केवळ खडसे यांच्यावर टीका करून या घटनेची जबाबदारी टाळता येणार नाही, कारण तुम्ही त्या खात्याचे मंत्री होते," असे खडसेंनी महाजन यांना सुनावले आहे.

काय म्हणाले होते गिरीश महाजन...

जमीन घोटाळा, दूध संघ घोटाळा आता नवीन रॉयल्टी वाचविल्याचा घोटाळा यामुळे एकनाथ खडसे चारही बाजूंनी घेरले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. अनेक प्रकारात खडसे यांची चौकशी सुरू आहे. कोर्ट कचेऱ्यामुळे ते विपन्न अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या डोक्याचा लवकर इलाज करून घ्यावा, आता ते महिनाभर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, आता त्यांनी पुन्हा डोक्याचे उपचार घ्यावेत, त्यांचे उपचार आम्ही शासकीय खर्चाने करू नाही तरी खडसे सर्व उपचाराची बिले शासनाकडून घेतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT