Girish Mahajan News : खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, इलाज करावा लागेल; गिरीश महाजनांनी डिवचलं...

Girish Mahajan slams Eknath Khadse : खडसे- महाजन यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे.
 Eknath Khadse, Girish Mahajan
Eknath Khadse, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि भाजप नेते व राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर चिखलफेक करीत असतात. "जमीन घोटाळा, दूध संघ घोटाळा आता नवीन रॉयल्टी वाचविल्याचा घोटाळा यामुळे एकनाथ खडसे चारही बाजूंनी घेरले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी खरमरीत टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

 Eknath Khadse, Girish Mahajan
Nanded Collector Office : सावकारी कर्जातून वाचवा... मुलांचा टाहो! किडनी विकणाऱ्या महिलेची पोलिसांकडून दखल

मी पालकमंत्री होतो, त्यावेळी हे सुरू झालं...

नाशिक येथील एम डी ड्रगप्रकरणी गिरीश महाजन यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन चौकशी करा, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यावर पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, मी पालकमंत्री असताना ड्रग कारखाना सुरू झाला, असा त्यांचा आरोप हास्यास्पद आहे. सहा वर्षांपूर्वी मी पालकमंत्री होतो, त्यावेळी हे सुरू झालं आहे, असे वक्तव्य डोक्यावर पडलेल्या माणसाचे असू शकते.

उपचाराची बिले सरकारकडून घेत असतातच...

"अनेक प्रकारात खडसे यांची चौकशी सुरू आहे. जामीन घोटाळा, दूध संघ घोटाळा,आता त्यांचा रॉयल्टी घोटाळा नवीन उघडकीस आला आहे, कोर्ट कचेऱ्यामुळे ते विपन्न अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या डोक्याचा लवकर इलाज करून घ्यावा, आता ते महिनाभर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, आता त्यांनी पुन्हा डोक्याचे उपचार घ्यावेत, त्यांचे उपचार आम्ही शासकीय खर्चाने करू नाही तरी खडसे सर्व उपचाराची बिले शासनाकडून घेत असतातच," असा टोला महाजनांनी खडसेंना लगावला आहे.

 Eknath Khadse, Girish Mahajan
Ulhasnagar News : महापालिकेच्या सहायक आयुक्तांवर शिपायानेच केला जादूटोणा? गुन्हा दाखल, कारच्या चाकाखाली लिंबू...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com