Jalgaon Lok Sabha Constituency 2024 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Lok Sabha News: गुलाबरावांनी गिरीश महाजनांना करुन दिली I LOVE U अन् I HATE U ची आठवण

Mangesh Mahale

Jalgaon News: पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे नेहमीच बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचा प्रत्यय अमळनेरच्या सभेत आला. महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ (Smita Wagh) यांच्या प्रचार सभेत गुलाबरावांनी 'आय लव यू'अन् 'आय हेट यू' मधील फरक सांगत सभेत हास्यांचे तुषार उडवले.

महायुतीच्या मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक वक्तव्य करत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना 2019 च्या विधानसभेत भाजपकडून झालेल्या बंडखोरीची आठवण करुन दिली. विधानसभेत एकमेकांचे विरोधक असलेले लोकसभा निवडणुकीत एकत्र येतात, याचे उदाहरण देत गुलाबरावांनी गिरीश महाजन आणि स्मिता वाघ यांना इशाऱ्यांची भाषा बोलून दिली.

स्मिता वाघ मुळच्या अमळनेरच्या आहेत, त्या विधानपरिषदेच्या आमदार होत्या. आता त्या खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. तो धागा पकडून गुलाबरावांना खान्देशातील आजी-माजी आमदारांच्या भूमिकेबाबत टोलेबाजी केली. अमळनेर विधानसभेच्या आमदार अनिल पाटील हे सध्या कॅबिनेट मंत्री आहे, यांची जाणीव करुन देत गुलाबरावांनी सभेत तुफान फटकेबाजी केली.

गिरीश महाजन यांच्याकडे पाहत गुलाबराव म्हणाले, 'अमळनेरचे आमदार अनिल पाटील हे कॅबिनेटमंत्री आहेत, आता माजी आमदार स्मिता वाघ या खासदार होणार आहेत. तुम्ही आम्हाला टाळलं. आम्ही लोकसभेत मदत करतोय. तुम्ही विधानसभेत मदत करा, नाही केली तर लक्षात ठेवा, असा इशारा गुलाबरावांनी गिरीश महाजन यांच्यासमोर स्मिता वाघ यांना दिला.

विधानसभेच्या निवडणुकीत सर्व एकमेकांच्या विरोधात असतात मात्र लोकसभेच्या निवडणुकीत दुश्मन के दुश्मन दोस्त हो जाते है , असे सांगत गुलाबरावांनी मागील निवडणुकीचा इतिहासाची आठवण करुन दिली.

गुलाबराव पाटील म्हणाले...

  • लोकसभेत बघा अमळनेरमध्ये शिरीष चौधरी आणि अनिल पाटील यांच्यात I LOVE U

  • तिकडे पाचोरा तालुक्यात किशोर पाटील आणि भाजपचे अमोल शिंदे यांच्यात I LOVE U

  • धरणगावमध्ये गुलाबराव पाटील आणि भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे यांच्यात I LOVE U

  • विधानसभा निवडणूक लागली का..I HATE U

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT