Ketaki Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress Vs BJP Politics : उल्हास पाटलांची कन्या भाजपात जाणार? काँग्रेसने स्पष्टच सांगितले

Jalgaon Congress : जळगावात काँग्रेसची जनसंवाद यात्रेची तयारी पूर्ण

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon Political News : राज्यात काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. याचा फटका जळगाव जिल्ह्यातील काँगेसलाही बसणार असल्याचे बोलले जाते. काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. मात्र ही अफवा असल्याचे जळगाव काँग्रेसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अशा चर्चांमुळे काँग्रेस आणि भाजपात तणाव होत असून राजकीय वातावरण तापत आहे. (Latest Political News)

केतकी पाटील (Ketaki Patil) यांच्याबाबत बोलताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवारांनी भाजपवर सडकून टीका केली. पवार म्हणाले, "काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याचे भाजप वारंवार सांगून संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा अफवा पसरवून भाजप काँग्रेस नेत्यांना बदनाम करत आहे. केतकी पाटलांबाबत होत असलेली चर्चाही अफवाच आहे", असे सांगत पवारांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच येत्या ३ ते १२ सप्टेंबरपर्यंत काँग्रेसतर्फे जळगाव जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढण्यात येणार असल्याचेही पवारांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस (Congress) भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी फुटल्यानंतर काँग्रेस पक्षही फुटणार असे सांगितले जात आहे. त्याबाबत अफवा पसविल्या जात आहेत. काँग्रेसचे सदस्य नसलेल्या काहींना व्यासपीठावर बोलावून त्यांनी पक्षप्रवेश केल्याचे दाखविले जात आहे. जिल्ह्यातही डॉ. केतकी पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्या कदापीही भाजपत जाणार नाहीत, काँग्रेस पक्षही फुटणार नाही."

काँगेसतर्फे येत्या रविवारपासून जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उनपदेव येथून या यात्रेस सुरुवात करण्यात येणार आहे. सर्व पदाधिकारी यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेत चित्ररथ असणार आहे. संपूर्ण तालक्यातील गावा-गावांत फिरून जनतेशी संवाद साधण्यात येईल. १२ सप्टेबरला फैजपूर येथे यात्रेचा समारोप होईल. त्यावेळी पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील, अशीही माहिती पवारांनी दिली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT