Mamata Banerjee Rakshabandhan : 'मातोश्री'वर रक्षाबंधन ! ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी

Uddhav Thackeray, Aditya Thackeray : 'बंगालची वाघीण' म्हणत ठाकरेंनी केले होते दीदींचे कौतुक
Mamata Banerjee ties Rakhi Uddhav Thackeray
Mamata Banerjee ties Rakhi Uddhav ThackeraySarkarnama

Mumbai Political News : पाटणा, बेंगळुरूनंतर 'इंडिया'ची गुरुवार-शुक्रवारी मुंबईत बैठक होणार आहे. यासाठी सहभागी पक्षांचे प्रमुख मुंबईत दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी इंडिया लोकसभेसाठी तयार असल्याचे सांगत मोदी-शाहांना इशारा दिला आहे. दरम्यान, बैठकीनिमित्त आलेल्या बॅनर्जी यांनी यंदा महाराष्ट्रात रक्षाबंधन साजरे केले. मातोश्रीवर जात ममतादीदींनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना राखी बांधली. या रक्षाबंधनाने 'इंडिया'तील सहभागी प्रादेशिक पक्षांत एकता वाढून लोकसभेसाठी फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. (Latest Political News)

Mamata Banerjee ties Rakhi Aditya Thackeray
Mamata Banerjee ties Rakhi Aditya ThackeraySarkarnama

मुंबईत येताच (Mamata Banergee) ममता बॅनर्जींनी 'इंडिया' आघाडी मजबूत होत असून लोकसभा निवडणुकीत 'खेला होबे' म्हणत भाजपला आस्मान दाखवणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरे केले. यावेळी त्यांनी बच्चन यांच्या निवास्थानावरून लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालमधील रक्षाबंधनची संस्कृतीही सांगितली. यानंतर त्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना राखी बांधली.

Mamata Banerjee ties Rakhi Uddhav Thackeray
Cyrus Poonawalla on Pawar : शरद पवारांना मित्राचा प्रेमाचा सल्ला; म्हणाले, '' त्यांचे वय झाले, राजकारणातून त्यांनी रिटायर व्हावे...''

अभिनेते बच्चन यांना राखी बांधल्यानंतर दिदी म्हणाल्या, "बीग बी अमिताभ बच्चन यांना भेटले, त्यांना राखीही बांधली, यामुळे मला खूप आनंद झाला आहे. मला हे कुटुंब आवडते. ते भारतातील मोठे कुटुंब आहे. त्यांनी देशासाठी योगदानही दिले आहे. मी त्यांना दुर्गापूजा आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. आम्ही लिंगभेद करत नसून बहिणींनाही राखी बांधतो", अशी माहितीही बॅनर्जी यांनी दिली.

'इंडिया'ची उद्यापासून दोन दिवस बैठक असून याचे यजमानपद ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे आहे. या बैठकीची तयारी झालेली असून 'इंडिया'च्या 'लोगो'चे आणि जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी राज्यात आलेल्या बॅनर्जींनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. दरम्यान, बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये विजयाची 'हॅटट्रिक' केल्यानंतर उद्धव ठकारेंनी 'बंगालची वाघीण' असे संबोधित तोंडभरून त्यांचे कौतुक केले होते.

Mamata Banerjee ties Rakhi Uddhav Thackeray
Monika Rajale To Dhananjay Munde : सत्ताधारी आमदारांनाही दुष्काळाच्या झळा; मोनिका राजळेंची कृषीमंत्री मुंडेंकडे मोठी मागणी!

दरम्यान, गॅस सिलिंडरचे दर कमी केल्याने ममता बॅनर्जींनी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली होती. "गेल्या दोन महिन्यांत 'इंडिया' आघाडीच्या फक्त दोनच बैठका झाल्या आणि आज आपण पाहतोय की एलपीजी गॅसची किंमत 200 रुपयाने कमी झाली आहे. ही आहे इंडियाची ताकद !'', असे ट्विट करून दीदींनी भाजपवर निशाणा साधला होता. बॅनर्जींची ही पोस्ट दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही शेअर केली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com