Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील रहिवासी व सध्या मुंबई येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले डी. यू. राऊळ यांच्या घरावर रविवारी (ता. ८) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.
सुदैवाने घरात झोपलेल्या त्यांच्या आई व बहिणीला वेळीच जाग आल्याने आग आटोक्यात आणता आली, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. घरावर पेट्रोल टाकणारे दोघे अनोळखी नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून आले होते. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
देवेंद्र ऊर्फ डी. यू. राऊळ हे सध्या मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. नगरदेवळा गावातील त्यांच्या राऊळ गल्लीतील घरात त्यांची आई व बहीण राहतात. शनिवारी (दि. ७) रात्री ९ वाजता जेवण करून ते झोपी गेले. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास डी. यू. राऊळ यांच्या आईला अचानक जाग आली. त्यांनी उठून पाहिले असता, त्यांना पेट्रोलचा वास आला आणि पडदा जळत असताना दिसला. त्यांनी तत्काळ आपल्या मुलीला उठविले व पाणी टाकून आग विझविली. यादरम्यान गल्लीत आरडाओरडा केल्याने शेजारी उठले व त्यांनी देखील दरवाजाला लागलेली आग विझविली.
सुरुवातीला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज होता. मात्र बाहेर कंपाउंडमध्ये येऊन पाहिले असता, पेट्रोलसाठी वापरलेली प्लॅस्टिकची बाटली व आगपेटी आढळून आली. त्यामुळे कोणीतरी दरवाजावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची आमची खात्र झाल्याचे फिर्यादीत किरण उमेश राऊळ (वय ३५) यांनी नोंदवले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान घराशेजारील एका किराणा दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता दोन अज्ञात व्यक्ती विना क्रमांकाची मोटारसायकल गणपती मंदिराजवळ उभी करून राऊळ गल्लीच्या दिशेने जाताना स्पष्टपणे कैद झाले आहेत. रात्री दोन वाजून ५८ मिनिटांचे हे चित्रण आहे. त्याआधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही बाब गंभीर असून नेमके हे प्रकरण काय आहे याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.