Nashik Deputy Mayor : एकनाथ शिंदेंपासून सुहास कादेंपर्यंत सगळ्यांनी काढली समजूत, तेव्हा कुठे प्रवीण तिदमेंनी केली तलवार म्यान

Pravin Tidme resignation : नाशिकच्या उपमहापौरपदासाठी प्रवीण तिदमे आग्रही होते. मात्र उपमहापौरपद विलास शिंदे यांना देण्यात आल्याने तिदमे यांनी नाराजीतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.
Eknath Shinde, Suhas Kande, Pravin Tidme
Eknath Shinde, Suhas Kande, Pravin TidmeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : शिवसेना शिंदे गटात उशिरा दाखल झालेले विलास शिंदे यांना नाशिकचे उपमहापौरपद दिल्याने पक्षात नाराजीचे फटाके फुटले. महागरप्रमुख व नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी पद डावलल्याच्या रागातून पक्षाच्या महागरप्रमुख पदासह नगरसेवक पदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला होता.

प्रवीण तिदमे हे उपमहापौरपदासाठी आग्रही होते. त्यांनी अर्जही दाखल केला होता. मात्र पक्षाने त्यांना माघार घ्यायला लावत विलास शिंदे यांना उपमहापौर केलं. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतून प्रवीण तिदमे दोन दिवस नॉटरिचेबल होते. त्यांनी आपला फोन बंद करुन ठेवला होता. सोमवार (दि.९) आज ते आपला महानगरप्रमुख पदाचा व नगरसेवक पदाचा राजीनामा देणार होते.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी तिदमे यांची समजूत काढली असून त्यानंतर आता तिदमे यांनी आपली तलवार म्यान केली असून आपण महानगरप्रमुख पदाचा व नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. सोमवारी (दि.९) पत्रकारपरिषद घेत तिदमे यांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले.

Eknath Shinde, Suhas Kande, Pravin Tidme
Nashik Deputy Mayor : नाशिकच्या उपमहापौरपदावरून शिंदे शिवसेनेत नाराजीचा स्फोट, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे राजीनामा देणार..

प्रवीण तिदमे यांच्या भूमिकेमुळे पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर येताच शिवसेना पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिदमे यांच्यासोबत संपर्क केला. त्यांनी तिदमे यांची समजूत काढली. बंटी मी तुझ्या पाठिशी आहे. तू कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घे. कारण संपूर्ण शिवसेना पक्ष तुझ्यासोबत आहे. तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेना बांधील आहे असं सांगत एकनाथ शिंदेंनी आपली समजूत काढल्याचं तिदमे यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांच्याशिवाय पक्षातील नेते दादा भुसे, नरेश मस्के, रामजी रेपाळे, हेमंत गोडसे , भाऊसाहेब चौधरी तसेच आमदार सुहास कांदे या सगळ्यांनीच मला समजून सांगितलं. नाशिक शहरातील सर्व आमदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक या सगळ्यांनी माझी समजूत काढली. चुकीचा निर्णय घेऊ नका. ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलंय त्या जनतेचा आदर राखला पाहीजे. तुमचं वय फार नाही, पुढे तुम्हाला निश्चित संधी मिळेल अशी समजूत माझी काढली. त्यामुळे जनभावनेचा आदर करुन मी राजीनामा न देण्याचा निर्णय घेत असल्याचं तिदमे यांनी जाहीर केलं.

Eknath Shinde, Suhas Kande, Pravin Tidme
Nashik NMC Politics : एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या अडचणी वाढल्या, नगरसेवक कमलेश बोडकेंवर दुसरा गंभीर गुन्हा दाखल

तुला न्याय मिळेल. सर्वात आधी पक्षात तू आला आहे. त्यामुळे निश्चितच भविष्यात तूला संधी मिळेल. तुला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्याने आपण आता आपल्या महागरप्रमुख पदाचा व नगरसेवक पदाचा राजीनामा देणार नसल्याचं तिदमे यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांनी मला फोन करुन मला न्याय दिला जाईल असा शब्द दिल्याने मी त्यांच्या आदेशाचे पालन करत आहे असं तिदमे म्हणाले.

तिदमेंनी सोशल मीडियावर व्यक्त केली होती खदखद

पक्षात उशीरा प्रवेश केलेल्या विलास शिंदे यांना नाशिकचे सह-संपर्कप्रमुख पद आणि आता उपमहापौर पद अशी दोन पदे देण्यात आली. तसेच एक वर्षे निगोसिएशन करून पक्षात आलेल्या अजय बोरस्ते यांना एकाचवेळी शिवसेना जिल्हा प्रमुख, उपनेते पद, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पद, नाशिक महापालिका गटनेते अशी चार महत्त्वाची पदे देण्यात आली. तर दुसरीकडे संघर्ष, निष्ठा आणि संघटन उभारणी करणाऱ्या शिवसैनिकांना डावलले जात असल्याची खदखद तिदमे यांनी सोशल मीडीयावर व्यक्त केली होती. आपण महानगरप्रमुख व नगरसेवक पदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com