Yashwant Bhosale  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Yashwant Bhosale : 'दुर्दैवानं सांगावं वाटतं, मी भाजपचा कार्यकर्ता'; 'श्रमिक'च्या भोसलेंचा नक्षलवादावर फडणवीस सरकारला घरचा आहेर

Jalgaon Yashwant Bhosale Maharashtra CM Devendra Fadnavis BJP Mahayuti government Naxalism : राष्ट्रीय श्रमिक आघाडी मेळाव्यात यशवंत भोसले यांनी ठेकेदारीतील नक्षलवादावर बोलताना सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप महायुती सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला.

Pradeep Pendhare

Maharashtra political updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यतंरी अर्बन नक्षलवादावरून काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला होता. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत अर्बन नक्षलींचा संबंध होता, असा देखील गंभीर आरोप केला होता.

आता मात्र भाजपबरोबर असलेल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या यशवंत भोसले यांनी अर्बन नक्षलवादावर मोठं भाष्य केलं आहे. यशवंत भोसले यांचे हे भाष्य भाजपच्या स्थापना दिनी केल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारला घरचा आहेर असल्याचे बोलले जात आहे.

यशवंत भोसले यांची राष्ट्रीय श्रमिक आघाडी भाजपबरोबर (BJP) आहे. जळगाव इथं या आघाडीचा मेळावा झाला. यात यशवंत भोसले यांनी मार्गदर्शन करताना, विविध उ‌द्योगात काम करणाऱ्या कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा तसेच समस्या सोडवण्यासंदर्भात जोर दिला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला अन् अर्बन नक्षलवादावर गंभीर विधान करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारला घरचा आहेर दिला.

यशवंत भोसले म्हणाले, "परमनंट कामगार (Worker) पद्धतीला तिलांजली देऊन प्रशासनातल्या काही लोकांनी, त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून ठेकेदारांना, गुंडांना कंत्राट देऊन स्थानिक भूमिपुत्रांचं शोषण चालवलं आहे. सगळ्यात मोठं अर्बन नक्षलवाद कुठे असेल, तर ठेकेदारीमध्ये आहे". हे ठेकेदार असलेल्या गुंडांमध्ये नक्षलवाद आहेत, ते समाजाची पिळवणूक करतात, असा गंभीर आरोप यशवंत भोसले यांनी केला.

मला दुर्दैवाने सांगावं वाटतं की मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. माझी संघटना पक्षाबरोबर आहे . पण सरकार कुठलेही असू द्या, सर्व सरकारांवर भांडवलदार आणि ठेकेदारांचा दबाव असतो, असे म्हणून भाजपचे कार्यकर्ते तथा राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी शोकांतिका व्यक्त करताना सरकारला घरचा आहेर दिला आहे.

फडणवीसांचे लक्ष वेधणार

राज्य विद्युत वितरण कंपनी, त्याचप्रमाणे विविध उ‌द्योगांमध्ये सरकारची कार्यालये आणि उपक्रमांमध्ये कायमस्वरूपी असलेल्या नोकरीच्या जागेवर बेकायदेशीररित्या कंत्राटी पद्धतीवर स्थानिक भूमिपुत्रांना पर्मनंट नोकरी देण्याऐवजी त्यांचे कंत्राटी पद्धतीवर शोषण चालू आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठविणार असल्याचे असल्याचे यशवंत भोसले यांनी सांगितले. काही ठेकेदारांचा नक्षलवाद चालू आहे, ही गंभीर बाब असून हा नक्षलवाद मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार आहे, असे सुद्धा यशवंत भोसले यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT