Jalgaon Political News : अजित पवारांनी टाकलेल्या एका डावाने जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांचा पक्ष खिळखिळा झाला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर या पक्षाचे नेते इतरत्र स्वत:चे राजकीय बस्तान बसवू पाहत आहेत. शरद पवारांच्या कृपादृष्टीने मंत्री झाले असे डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यासह दोन माजी आमदार अजित पवार गटाच्या पालखीचे भोई बनले आहेत.
जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाचे चागंले वर्चस्व होते. परंतु लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या अकराही जागा सत्ताधारी महायुतीने जिंकल्याने शरद पवार गटाला या जिल्ह्यात नैराश्य आलं. त्यातूनच पाटील व देवकर यांच्या सारख्या भरवशाच्या शिलेदारांनी पवारांची साथ सोडून सत्तेच्या कुशीत विराजमान व्हायचं ठरवलं. त्यामुळे पक्षाला मोठी गळती सुरु झाली आहे.
देवकर पाटील यांच्यासोबत पवारांच्या तालीमीत घडलेले अनेक पदाधिकारी पक्षाला सोडून गेलेत. त्यात चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, विधान परिषदेचे माजी सदस्य दिलीप सोनवणे, जळगाव जिल्हा बॅंकेच्या माजी संचालक तिल्लोत्तमा पाटील, जेडीसीसीचे संचालक नाना पाटील, मजूर फेडरेशनचे सभापती रोहिदास पाटील, माजी सभापती लिलाधर तायडे यासह अनेक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक गावचे सरपंच, बाजारसमितीचे संचालक यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.
एकेकाळी शरचंद्र पवार पक्षाचे खंदे समर्थक असलेले पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ हेही आता शरद पवार यांच्या सोबत नाहीत. त्यांचेही भाजपात जाण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही राजीनामा दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच शरद पवारांच्या पक्षाची मोठी हानी यातून झाली आहे.
पवारांचे हे सगळे शिलेदार आजवर खान्देशात पक्षाची खिंड लढवत होते. मात्र पवारांच्या डोळ्या देखत हा किल्ला आता ढासळला आहे. पक्षाला यातून तारु शकेल असं प्रबळ नेतृत्व उरलेलं नाही. पैकी एकनाथ खडसे अजून शरद पवार यांच्या पक्षात असले तरी त्यांची ती अपरिहार्यता आहे.
त्यांनाही भाजपने आश्रय दिल्यास तेही पवारांची केव्हाही साथ सोडू शकतात. शरद पवार यांच्यावर निष्ठा असलेले रवींद्र पाटील यांच्यासारखे काही मोजकेच शिलेदार पवारांसोबत आहेत. त्यामुळे जळगावात शरद पवारांचा पक्ष पोरका झाल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यत होऊ लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.