Girish Mahajan-Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : जळगावात सध्या फक्त शिवसेना-भाजपची युती फिक्स ; अजितदादांना सोबत घेणार की नाही?

Jalgaon municipal election : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमची फक्त शिवसेना शिंदे गटासोबत युती झालेली आहे, असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. राष्ट्रवादीसोबत अद्याप चर्चाच सुरु असल्याचे ते म्हणाले.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : नाशिक महापालेकत ज्या पद्धतीने महायुतीमधील घटकपक्षांमध्ये युती व जागावाटपाबाबत घोळ सुरु आहे तसेच काहीसे चित्र जळगाव महापालिकेच्याही बाबतीत आहे. फक्त फरक इतकाच आहे की जळगावमध्ये भाजप-शिवसेना युतीचे फिक्स झाले आहे. केवळ राष्ट्रवादीबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही. तसे नाशिकमध्ये आजून कुणाचेच काही फिक्स नाही.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची केवळ शिवसेना शिंदे गटासोबत सोबत युती झालेली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याशी अजून चर्चा सुरू आहे. त्यामुळे आमची महायुती नव्हे, केवळ सध्या फक्त दोन पक्षांची युती आहे, असे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी काल स्पष्ट केलं.

महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे इच्छुकांची बैठक घेण्यात आली होती. यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण, निवडणूकप्रमुख आमदार सुरेश भोळे हेही यावेळी उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले, की भाजप व शिवसेनेशी युतीची आमची चर्चा होऊन कुणी किती जागा लढवायच्या हे जवळपास निश्चित करण्यात आले आहे. काही जागांवर तडजोड करण्यात आली असून, आम्ही ५० जागांवर लढणार आहोत. त्यापेक्षा कमी जागा घेणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत आमची कोणत्याही जागांबाबत चर्चा झालेली नाही. त्यांच्यासोबत जागेबाबत निश्चित झाल्यावर आम्ही ‘महायुती’ जाहीर करू. याबाबत आज पुन्हा बैठक होणार असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेता की नाही याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

६४ पेक्षाही अधिक जागा जिंकणार

२०१८ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने ७५ जागा लढविल्या हाेत्या. यात तब्बल ५७ जागांवर आमची उमेदवार विजयी झाले होते. या वेळी युतीने लढणार असून, विराेधी पक्षाचे काहीही दिसत नाही. त्यामुळे या वेळीही ६४ पेक्षाही अधिक जागा जिंकणार असा आमचा विश्वास आहे, असे मंत्री महाजन यांनी या वेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT