Minister Gulabrao Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Shiv Sena ghost : अरे बाप ! जळगावच्या शिवसेना कार्यालयात भूत? भीतीने कार्यकर्ते फिरकेनात, काय आहे प्रकरण?

Shiv Sena office in Jalgaon, Rumors of a ghost : जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी शिवसेनेचे (शिंदे गट) नवीन कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. या कार्यालयाचे 4 जून रोजी उद्घाटन होणार आहे. मात्र, त्याआधीच कार्यालयामध्ये भूत पसरल्याची अफवा पसरली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon News : जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी शिवसेनेचे (शिंदे गट) नवीन कार्यालयाचे काम पूर्ण झाले आहे. या कार्यालयाचे 4 जून रोजी उद्घाटन होणार आहे. मात्र, त्याआधीच कार्यालयामध्ये भूत पसरल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे भुताच्या भीतीने कार्यकर्तेच कार्यालयात जायला नकार देत आहे. कार्यकर्त्यांनी कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

मात्र शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. या सगळ्या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. चार जूननंतर मीच या कार्यालयात बसणार, तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

नव्यानेच उभारण्यात येत असलेल्या या कार्यालयात भूत असल्याची अफवा परल्याने हे कार्यालय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हे कार्यालय उभारण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यालयाचे काम सुरु असून जवळपास ते आता पूर्णत्वास आले आहे. या इमारतीचं उद्घाटन 4 जून रोजी होणार आहे. मात्र कार्यालयात भूत असल्याच्या भीतीने कार्यकर्ते या कार्यालयाकडे फिरकायलाही तयार नाही.

खऱ्या अर्थाने ही चर्चा सुरु झाली ती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका भाषणामुळे. भाषणादरम्यान त्यांनी स्वत: या अफवेचा उल्लेख केला आणि कार्यकर्त्यांमध्ये भुताच्या अफवेने भीती पसरल्याचं सांगितलं. तसेच ही केवळ अफवा असल्याचे पाटील म्हणाले. कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका, मी स्वतः या कार्यालयात नियमित बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जळगाव शहरातील पांडे चौक परिसरात हे मध्यवर्ती कार्यालय उभारले जात आहे. मात्र शिवसेना कार्यालयात भूत असल्याच्या अफवेने कार्यकर्त्यांमध्ये भीती पसरली आहे. ही भीती दूर करण्यासाठी स्वत: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे येत्या 4 जून रोजी त्या कार्यालयाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्घाटन झाल्यानंतर कार्यकर्ते या कार्यालयात जातात किंवा नाही हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT