Chhagan Bhujbal : 'PMLA कायद्याचा पहिला बळी मीच', माझी अडीच वर्ष तुरुंगात गेली ; भुजबळांची खंत...

Chhagan Bhujbal reveals he was the first to suffer under PMLA law : या कायद्यातील नवीन सुधारित तरतुदीमुळे माझी अडीच वर्षे तुरुंगात गेल्याची खंत भुजबळांनी बोलून दाखवली. आपल्याविरोधात काहीच निघाले नाही, त्यामुळे मी सुटलो असं भुजबळ म्हणाले.
Chhagan Bhujbal 1
Chhagan Bhujbal 1sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) सध्या देशात चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या कायद्यावर मौन सोडले असून या कायद्याचा पहिला फटका आपल्यालाच बसला, मला अडीच वर्ष तुरुंगात काढावी लागली असं म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात काल शरद पवार यांनी या कायद्याविषयी भाष्य केलं. त्यानंतर PMLA कायदा पुन्हा चर्चेत आला आहे. हा कायदा माजी मंत्री पी. चिदंबरम यांचे पाप आहे असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. पीएमएलए हा कायदा 2002 मध्ये करण्यात आला. त्यावेळी त्यात ए आणि बी दोन भाग होते. ए मध्ये जामीन मिळत नव्हता आणि बी मध्ये जामीन मिळत होता. मात्र 2013 साली पी. चिदंबरम यांनी दोन्ही कायदा एकत्र केला. अरुण जेटली आणि शरद पवार यांनी विरोध केला पण चिदंबरम यांनी ऐकलं नाही असं भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal 1
Eknath Shinde : सदस्य नोंदणीचे दीड लाखांचे टार्गेट, पूर्ण करता-करता शिंदे गटाचे नाकीनऊ

या कायद्यातील नवीन सुधारित तरतुदीमुळे माझी अडीच वर्षे तुरुंगात गेल्याची खंत भुजबळांनी बोलून दाखवली. आपल्याविरोधात काहीच निघाले नाही, त्यामुळे मी सुटलो. पण आयुष्यातील अडीच वर्ष तुरुंगात गेली आणि प्रचंड मानसिक त्रास झाल्याचे भुजबळांनी सांगितलं.

चिदंबरम यांचा मुलगा कार्तिक, त्यानंतर स्वत: चिदंबरम यांनाही या कायद्याचा फटका बसला. चिदंबरम या भिंतीवरून त्या दारावरून पाठी मागून उड्या मारतोय आणि पळतो हे सर्व आम्ही पाहीले. तुम्ही स्वत:ला मोठे वकील समजतात. भविष्यामध्ये त्याचा उपयोग किती दुरुपयोग किती याचा विचार करूनच कायदे करायला पाहिजे, असा टोलाही भुजबळांनी चिदंबरम यांना लगावला.

भुजबळ म्हणाले, कायदा करताना चिदंबरम यांच्या डोळ्यावर वेगळीच झाक आली होती. त्याचा भोग त्यांना भोगावा लागला. त्यानंतर त्याचा अनेकांना भोग भोगावा लागला. चिदंबरम यांनी या कायद्यात अशी तरतूद केली की वर्ष, दोन वर्ष, चार वर्षे, पाच वर्ष जामीनच मिळाला नाही. हा कायदा बदलण्याचे पाप चिदंबरम यांनी केले, असा घणाघात भुजबळ यांनी केला.

Chhagan Bhujbal 1
Nashik News : रक्षकच बनला भक्षक, पतीला ठार करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार, पोलिसाला अटक

शरद पवार काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी काल खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तक प्रकाशनाविषयी या कायद्यावर मोठे भाष्य केले होते. हा कायदा अत्यंत घातक असून राज्य बदलले की या कायद्याचा परिणाम आपल्यालाही भोगावा लागेल असे मी त्यावेळी निदर्शनास आणून दिले होते. पण माझे कुणी ऐकले नाही. सत्ताबदल झाल्यावर त्याचा पहिला फटका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनाच बसला. विरोधकांना उद्ध्वस्त करणाऱ्या कायद्यातील कठोर तरतूद रद्द केली पाहीजे असे शरद पवार यांनी म्हटले. या कायद्याचा राजकीय हेतुने वापर करण्यात येत असल्याचा आरोप पवार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com