Sagar Moholkar attack Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sagar Moholkar attack : ...दहा पोलिसही थरथरायचे! 'त्या' सागर मोहोळकरावर दोघांनी झाडल्यात गोळ्या!

Notorious Jamkhed gangster Pailwan Sagar Moholkar was shot at by two unidentified attackers, prompting Ahilyanagar police to deploy four teams to track down the suspects : जामखेडमधील कुख्यात सागर मोहोळकर याच्यावर एकापेक्षा दोन जणांनी जवळून गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar crime news : जामखेड इथल्या शहरात गोळीबारात जखमी झालेला कुख्यात पैलवान सागर मोहोळकर याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावरील हल्लेखोराच्या शोधासाठी अहिल्यानगरच्या पोलिस दलाने चार पथकांची नियुक्ती केली आहे.

सागरवर हल्ला करणारे दोन दुचाकीवरून तिघे आले होते. त्यातील दोघांनी त्याच्यावर हल्ला चढवला. गोळ्या झाडण्यासाठी गावठी पिस्तुलाचा वापर झाला, अशी माहिती पोलिस तपासात समोर येत आहे. सागरवर हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप कळू शकलेले नाही.

सागर मोहोळकर याचे अनेक किस्से चर्चेत आहे. पुण्याचा (Pune) कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या कानशि‍लात देखील त्याने लगावली होती. याशिवाय त्याला काबूत ठेवण्यासाठी एका-दोघांचे काम नसायचे. पोलिस दलाकडून अशी माहिती मिळते की, त्याला काबूत ठेवण्यासाठी पोलिस देखील थरथरायचे. चांगलीच दमछाक व्हायची. दहा पेक्षा जास्त पोलिस त्याला काबूत ठेवण्यासाठी लागायचे. त्यानंतर तो काबूत यायचा. अशा सागर मोहोळकर याच्यावर गोळ्या झाडल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

सागर मोहोळकर याच्यावर दोन खुनासह इतर देखील गुन्हे (Crime) दाखल आहेत. तो महिन्याभरापूर्वीच नाशिक कारागृहातून बाहेर आला होता. अशा या कुख्यात पैलवानावर जामखेड इथं नुराणी काॅलनी बुधवारी रात्री हल्ला करण्यात आला. दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर हल्ला केला. या दोघांनी त्याच्यावर जवळून सहा गोळ्या झाडल्या. त्यातील चार ते पाच गोळ्या त्याला लागल्याची माहिती मिळते आहे. हल्लेखोरांनी गोळ्या झाडण्यासाठी गावठी पिस्तुलाचा वापर केल्याचीही माहिती समोर येत आहे.

सागर मोहोळकर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून, त्याचे अनेक दुश्मन आहेत. त्याच्यावर हा हल्ला झाला. पाळत ठेवून हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक माहिती तपासात पुढे येत आहे. पण हा हल्ला नेमका कोणी आणि कशातून केला हे अजून समोर येत नाही. पण ज्यापद्धतीने हल्ला केला आहे, त्यानुसार कोणतीतरी गुंड टोळी आहे, असे समोर येत आहे.

कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला गेल्या वर्षी 11 एप्रिल 2025मध्ये सोलापूर इथं मोहोळकर याने कानशि‍लात लगावली होती. मोहोळकर याच्यावरील हल्ल्यामागे घायवळ टोळी अँगल आहे का, याचा देखील पोलिसांकडून तपास होत आहे. प्राथमिक तपासात अजून तरी तसं काही समोर आलेलं नाही, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. पण लवकरच या हल्ल्यामागील कारण, सूत्रधार समोर आणू, घटनेचा उलगडा करण्यापर्यंत पोहोचलो आहे, असेही संबंधित पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आले आहे.

जखमी मोहोळकराची प्रकृती चिंताजनक

सागर मोहोळकर याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर जामखेड इथं खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर आता पुणे इथल्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT