ACB Raid News: GSTचा मोठा 'मासा' ACBच्या जाळ्यात! राज्यभरातील कार्यालयांमध्ये खळबळ

Mumbai ACB Action on Nashik GST Officer:सव्वा कोटी रुपयांची रक्कम खूपच जास्त असल्याने संबंधित व्यापाऱ्याने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला. त्यानंतर व्यापारी आणि अधिकारी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली.
Mumbai ACB Action on Nashik GST Officer
Mumbai ACB Action on Nashik GST Officer Sarkarnama
Published on
Updated on

ACB News: सेवा वस्तू कर (जीएसटी) विभागातील एक मोठा 'मासा' लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. नाशिकच्या एका व्यापाऱ्याकडे चक्क सव्वा कोटीची लाच मागण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या संदर्भात थेट मुंबई कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली.

नाशिक शहरातील एका व्यापाऱ्यावर जीएसटी विभागाने कर भरण्यातील अनियमितता आढळल्याने कारवाई केली होती. त्यासाठी संबंधित व्यापाऱ्याला नोटीस बजावण्यात आली. ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर सहाय्यक आयुक्त असलेल्या अधिकाऱ्याने मध्यस्थीमार्फत संबंधिताचा छळ सुरू केला.

नाशिकचे कार्यालयातील उपायुक्त सोमनाथ पागे, सहाय्यक कर आयुक्त मच्छिंद्र विठ्ठल दोंदे यांनी संबंधित व्यापाऱ्यातकडे कारवाई टाळण्यासाठी तडजोडीचा प्रस्ताव दिला. त्यासाठी खासगी व्यक्ती अमित हिरामण जाधव यांच्या मार्फत सातत्याने व्यापाऱ्याकडे पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याने त्रस्त झालेल्या व्यापाऱ्याने यातून सुटका करण्यासाठी अधिकाऱ्यांची गाठ घेतली.

Mumbai ACB Action on Nashik GST Officer
Maharashtra Budget 2026: फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणेकरांना काय दिले?

या प्रकारातून सुटका करायची असेल तर सव्वा कोटी रुपये द्यावे लागतील, असा प्रस्ताव व्यापाऱ्याला देण्यात आला. जाधव यांच्या मार्फत थेट सव्वा कोटी रुपयांची लाच मागण्याचा हा प्रकार आहे. या संदर्भात व्यापाऱ्याने काही तडजोड करावी अशी विनंती केली.

सव्वा कोटी रुपयांची रक्कम खूपच जास्त असल्याने संबंधित व्यापाऱ्याने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला. त्यानंतर संबंधित विभागाने व्यापारी आणि खासगी व्यक्ती व अधिकारी यांच्यावर पाळत ठेवून खातर जमा केली. त्यानंतर कारवाईचा भाग म्हणून व्यापाऱ्याने तडजोडीचा प्रस्ताव दिला.

Mumbai ACB Action on Nashik GST Officer
Gokul Dudh Sangh Election: गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटलांना धक्का; 'हा' बडा नेता लागला मुश्रीफांच्या गळाला

या प्रकारातून सुटका करायची असेल तर सव्वा कोटी रुपये द्यावे लागतील, असा प्रस्ताव व्यापाऱ्याला देण्यात आला. जाधव यांच्या मार्फत थेट सव्वा कोटी रुपयांची लाच मागण्याचा हा प्रकार आहे. या संदर्भात व्यापाऱ्याने काही तडजोड करावी अशी विनंती केली.

सव्वा कोटी रुपयांची रक्कम खूपच जास्त असल्याने संबंधित व्यापाऱ्याने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला. त्यानंतर संबंधित विभागाने व्यापारी आणि खासगी व्यक्ती व अधिकारी यांच्यावर पाळत ठेवून खातर जमा केली. त्यानंतर कारवाईचा भाग म्हणून व्यापाऱ्याने तडजोडीचा प्रस्ताव दिला.

जाधव यांच्यामार्फत अधिकारी दोंदे आणि पागे यांनी यांनी पहिला हप्ता म्हणून वीस लाख रुपये मागणी केली. त्याला मान्यता दिल्यावर शुक्रवारी दुपारी तीन वाजता कार्यालयात दोन लाख रुपये स्वीकारताना अधिकाऱ्यांना पकडण्यात आले. ही कारवाई झाल्याने राज्यभरातील जीएसटी विभागात एकच खळबळ उडाली.

Mumbai ACB Action on Nashik GST Officer
Maharashtra Police: जिथं भांडी घासली तिथंच खाकी वर्दीत सत्कार झाला! वेटर ते PSI: संग्राम मळकर यांची संघर्षगाथा तुम्हाला माहीत आहे का?

मुंबईच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांनीही कारवाई केली. उपयुक्त पागे यांसह सहाय्यक आयुक्त दोंदे आणि जाधव यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता दोन लाख रुपयांची रोकड आढळून आली. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन मुंबई एसीबी उपायुक्त अनिल घेरडीकर, पोलीस निरीक्षक मोहन जगदाळे यांनी अधिकाऱ्यांच्या घरांची ही झडती घेतली.

या संदर्भात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या कारवाईने जीएसटी विभागाच्या सर्व कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com