Sagar Moholkar 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sagar Moholkar : पैलवान मोहोळकरवरील गोळीबारामागे नीलेश घायवळ गँग कनेक्शन; कानशिलात लगावणं भोवलं!

Ahilyanagar police investigation reveals that the Pune-based gangster Nilesh Ghaiwal gang was behind the firing on notorious Jamkhed criminal Sagar Moholkar : कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याच्यावरील हल्ल्यामागे पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याची टोळी असल्याचं समोर आलं आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar crime news : जामखेडमधील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याच्यावर करण्यात आलेल्या गोळीबारामागे पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ टोळीचं कनेक्शन उघड झालं आहे. हल्ल्यामागे कोणताही पुरावा नसताना, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी आणि त्यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आला.

या गुन्ह्यात अभिमन्यू महादेव पोते (वय 24, रा. भुतवडा रोड, लाईट बोर्ड शेजारी, जामखेड) याला अटक केली आहे. तसंच त्याच्याकडून गुन्ह्यात वापरालेली गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, दुचाकी असा एकूण 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पैलवान सागर मोहोळकर याच्यावर 04 मार्चला रात्री 07.30 वाजता जामखेड शहरातील नुराणी कॉलनी इथं दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी येत गोळीबार केला होता. मोहोळकर याच्यावर गावठी पिस्तुलातून हा गोळीबार झाला होता. किसन मोहोळकर (रा. जांबवाडी, ता. जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Police) गुन्ह्याची नोंद घेतली.

सागर मोहोळकर याच्यावर पाळत ठेवून हल्ला (Crime) करण्यात आला होता. त्यामुळे हल्ल्यात कोणतेही पुरावे नव्हते. परंतु नीलेश घायवळ याच्याशी झालेल्या वादाचा एक संदर्भ होता. धाराशिव इथल्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या यात्रेत गेल्यावर्षी 11 एप्रिल 2025मध्ये मोहोळकर याने घायवळ याच्या कानशि‍लात लगावली होती. पण या घटनेला दहा महिन्यापेक्षा अधिक काळ गेला होता. त्यामुळे सुरवातीला तपासात पोलिसांनी हा संदर्भ टाळला. यात नीलेश घायवळ हा पुण्यातून फरार आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी, तपासात काही असे व्यावसायिका दुवे मिळाले की, त्यातून त्याचे कनेक्शन पुण्यातील कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळच्या गँगपर्यंत गेलं. मोहोळकर याने घायवळ याच्या कानाशिलात लगावल्याचा बदला त्याच्यावर गोळीबार करून घेतला. यात हल्ल्यात मोहोळकर याला कायमचे संपवायचे होते, असे नियोजन होते.

मोहोळकरवर ठेवली जात होती पाळत

यासाठी मोहोळकर याच्यावर पाळत ठेवली जात होत. मोहोळकर हा गेल्या महिन्यातच नाशिक कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. यावर जामखेडमधील अभिमन्यू पोते हा लक्ष ठेवून होता. मोहोळकर याचा माग लक्षात आल्यानंतर त्याने पुण्यातील साथीदारांना बोलावून घेत, चार मार्चला रात्री साडेसात वाजता हल्ला चढवला.

एकाला अटक, तर तिघे पसार

अभिमन्यू पोते याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि दुचाकी जप्त केली आहे. यात गुन्ह्यात अभिमन्यू पोते याचे साथीदार ज्ञानेश्वर साठे ऊर्फ चार्ली उर्फ माऊली, रोहित विठ्ठल आखाडे चिन्या (पूर्ण नांव माहित नाही. सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे) हे तिघे पसार आहेत.

हल्ल्यात किती शस्त्रांचा वापर?

सागर मोहोळकर याच्यावर अगदी जवळून गोळीबार करण्यात आला. हल्ल्यात गावठी पिस्तुलाचा वापर झाल्याचं समोर आलं आहे. पण सुरवातीला दोघांनी दोन पिस्तुलातून गोळीबार केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत होतं. आता या गुन्ह्यात तिघे पसार आहेत. त्यांच्या अटकेनंतरच हल्ल्यात किती शस्त्रांचा वापर झाला, याचा उलगडा होईल.

मोहोळकरची प्रकृती चिंताजनक

सागर मोहोळकर याची प्रकृती चिंताजनकच आहे. त्याच्यावर पुणे इथल्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे सात गोळ्या त्याच्यावर झाडण्यात आल्याचं सांगितलं जात असून, त्यातील पाच गोळ्या त्याला लागल्या आहेत. यात त्याच्या तोंडात सुद्धा गोळ्या मारल्या आहेत. छातीवर देखील गोळी लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT