Devendra Fadnavis : '...तर मीसुद्धा बिनडोक ठरेन'; फडणवीसांचा टोला, नेमकं प्रकरण काय?

BJP CM Devendra Fadnavis responded in Mumbai to Maharashtra Congress president Harshwardhan Sapkal criticism over the Gadchiroli iron project : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
Devendra Fadnavis 1
Devendra Fadnavis 1Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गडचिरोलीमधील लोखंड खाणीवर जहरी टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.

'कोणी बिनडोकपणे बोललं, अन् त्याला मी उत्तर दिलं तर, मी देखील बिनडोक ठरेल,' असा सणसणीत टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला आहे.

काँग्रेसचे (Congress) हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीमधील लोखंड काढून ते विदेशात पाठवत आहे. तेच लोखंड पुन्हा विदेशातून घ्यायचं. हा सर्व घाट शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू आहे, असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला होता.

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी, 'यावर जोरदार पलटवार केला. कोणी माझ्या स्तरावर बोलले तर, मी उत्तर देईल. पण कोणी बिनडोकसारखे बोलत असेल आणि मी त्याला उत्तर दिले तर, मी सुद्धा बिनडोक ठरेल,' असे म्हटले.

Devendra Fadnavis 1
Padma Shri Bhiklya Dhinda : पद्मश्री मिळाली, पण जगणं कठीण! तारपा वादक भिकल्या धिंडा अडचणीत; सत्यजीत तांबे म्हणाले, 'सरकारने...'

भाजप महायुती सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. तसंच नियमित कर्ज भरणाऱ्यांना देखील अनुदान जाहीर केलं आहे. यावर विरोधकांनी फसवी कर्जमाफी, असा उल्लेख करत, किमान चार लाखापर्यंत काळानुसार कर्जमाफी हवी होती, असे म्हटलं. विरोधकांच्या या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

Devendra Fadnavis 1
Uber Driver Murder : 'उबेर'चा ड्रायव्हरच निघाला लुटारू! इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला टार्गेट; पुढे घडलं थरारक...

यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी, गिरा तो टांग उपर, अशापद्धतीने विरोधकांचे सुरू आहे. जनता विरोधकांसोबत नाही. जनतेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना जनतेने जमीन दाखवली आहे. आणि आम्ही निवडणुका जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे. निवडणुका जिंकण्याकरीता कर्जमाफी केलेली नाही. विरोधकांनी कितीही आंदोलनं केली तरी, जनता त्यांच्यासोबत नाही, असे ठासून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com