Women candidates in Jamner reportedly travelled overnight to escape alleged political pressure. The image highlights the tense atmosphere surrounding the Jamner election. Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jamner election controversy : माघारीसाठी हायव्होल्टेज ड्रामा; भाजपच्या भीतीने महिला उमेदवारांनी चक्क घर सोडले!

Jamner Muncipal Election controversy : जामनेर शहरात मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या आहेत. त्यावर देखील या नेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. पाच उमेदवारांना दबावाने माघार घेण्यास भाग पाडले. एका महिलेचा अर्ज बाद करण्यात आला, असा आरोप विरोधकांनी केली आहे.

Sampat Devgire

Jamner Muncipal Election : नगरपालिका निवडणुकीत काल माघारीचा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर अनेक वादग्रस्त प्रकार घडले. माघारी साठी दबाव तंत्र आणि गैरमार्गाचा वापर झाल्याचे आरोप आहेत. भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप झाले आहे.

जामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी दबाव आणून अर्ज बाद केल्याची चर्चा आहे. अनेक उमेदवारांवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दडपशाही आणि दादागिरी करून माघार घेण्यास भाग पाडल्याचे बोलले जाते.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दिलीप खोडपे यांनी गंभीर आरोप केला. मंत्री महाजन यांनी शहराचा विकास केला असा दावा असेल तर निवडणुका लढवण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले. माघारीसाठी गेले दोन दिवस जामनेर शहरात राजकीय वातावरण आणि विविध मार्गांचा वापर होत होता.

उमेदवारांच्या कुटुंबियांवर दडपण आणि धमक्या दिल्या जात होत्या. त्यामुळे अनेक उमेदवार दडपणाखाली आले होते. गरीब घरातील महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने भाजपच्या नेत्यांनी त्यांना धमकावल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे दोन दिवस हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता.

त्या भीतीने काही महिला उमेदवारांनी चक्क घर सोडून रात्रभर प्रवास करीत स्वतःला वाचवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या संदर्भात प्रभाग क्रमांक चार उमेदवार जावेद मुल्ला यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. या उमेदवारांची माघार घेण्यासाठी दहशतीचा वापर झाल्याचे त्यांनी सांगितले.

या दहशतीपासून बचावासाठी जावेद मुल्ला यांनी अंजुम इरफान शहा, खाबीयाबी गुलाब खान, परविनबी शेख नाझीम, बतुलबी हुसेन कुरेशी या महिला उमेदवारांना घेऊन चक्क रात्रभर वाहनात प्रवास करीत होते. भाजप नेत्यांच्या भीतीने घर सोडून रात्रभर बाहेर राहावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

जामनेर शहरात मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या आहेत. त्यावर देखील या नेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. पाच उमेदवारांना दबावाने माघार घेण्यास भाग पाडले. एका महिलेचा अर्ज बाद करण्यात आला. सत्ताधारी निवडणुकीला घाबरले त्यामुळे हे प्रकार घडले, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

जामनेर नगरपालिकेत २६ जागांपैकी नऊ जागांवर माघार घेण्यात आली. माघार घेणाऱ्या या उमेदवारांना अक्षरशः कॉलर पकडून धमकावले. धक्काबुक्की केली. जबरदस्तीने कार्यालयात आणल्याचे व्हिडिओ आहेत. माघारी नंतर एका उमेदवाराला अक्षरशा रडू कोसळले.

या प्रकारावर जलसंपदा मंत्री महाजन यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले. लोक स्वतःहून माघार घेत आहेत. एकाही उमेदवाराने जबरदस्ती झाल्याची तक्रार केलेली नाही. त्यामुळे माघारीसाठी गैरप्रकार झाले नाही असा दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT