Mahayuti Politics : 'ते उपमुख्यमंत्री पण फडणवीस मुख्यमंत्री, त्यामुळे मतदान...', अजितदादांच्या आमदाराच्या मतदारसंघात जाऊन चंद्रकांत पाटलांनी केलेलं वक्तव्य चर्चेत

Ajit Pawar NCP vs BJP : 'जेव्हा आमचे दोन खासदार होते तेव्हा आम्ही खचून गेलो नाही आणि आता तीनदा सत्तेत आलो म्हणून माजलो नाही. ये दुसरे सगळे पक्ष संपावून टाका, ए आण रे त्याला उचलूनस असं काही केलेलं नाही. नेत्यांना लोकांना वाटतंय भविष्य भाजपच आहे, म्हणून ते येत आहेत.'
Chandrakant Patil & Ajit Pawar
Chandrakant Patil addressing BJP workers during the Bhor election campaign, highlighting rising tensions within the Mahayuti alliance. The image captures the ongoing political clash in Bhor.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 22 Nov : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील मित्रपक्ष आमने-सामने ठाकले आहेत. भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तेतील तिन्ही मित्रपक्ष एकामेकांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पळवल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळा सुरू आहेत. भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असलेल्या नितीन सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षप्रवेश करून घेतला असून त्यांनी या निवडणुकीतून माघार देखील घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर भोरमध्ये जाऊन भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पळावा पळवी आणि इन्कमिंगवर मोठं भाष्य केलं आहे. भोरमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचार शुभारंभवेळी, मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विरोधी पक्ष म्हणतोय आम्ही पिण्याला पाणी देणारं पण त्यासाठी त्यांचं सरकार असलं पाहिजे ना?

Chandrakant Patil & Ajit Pawar
Karnataka Congress : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा, काँग्रेस नेत्यांनी दिल्ली गाठताच उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, 'माझे 140 आमदार...'

जरी इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार असलं त्यांचा आमदार इथे असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण ते उपमुख्यमंत्री आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांना मतदान करा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

त्यांच्या या विधानामुळं निवडणूक प्रचार चांगलाच तापण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून सुरू असलेले उमेदवारांची पळवा पळवी आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या इन्कमिंग वर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले तरी आम्ही माजलो नाही.

Chandrakant Patil & Ajit Pawar
Balasaheb Thackeray: खरी मेख वेगळीच! उद्धव ठाकरेंवर मेहरबान होतानाच बाळासाहेब स्मारकाच्या सर्व चाव्या फडणवीसांकडे

जेव्हा आमचे दोन खासदार होते तेव्हा आम्ही खचून गेलो नाही आणि आता तीनदा सत्तेत आलो म्हणून माजलो नाही. ये दुसरे सगळे पक्ष संपावून टाका, ए आण रे त्याला उचलूनस असं काही केलेलं नाही. नेत्यांना लोकांना वाटतंय भविष्य भाजपच आहे, म्हणून ते येत आहेत. माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये आल्या आल्या त्यांच्या राजगड साखरं कारखान्याला मदत झाली. ती काँग्रेसमध्ये झाली नसती.'

दरम्यान भोर नगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी महायुतीतल्या दोन पक्षांमध्ये लढत होत आहे. सध्या भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे हे जरी भाजपमध्ये आले असले, तरी सध्याचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर हे आहेत. त्यामुळे भोरमध्ये सत्ता जरी अजित पवार यांची असली, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच मतदान करा, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com