Jalgaon Gram Sabha Dispute Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon News : ग्रामसभेत प्रश्न विचारला अन् माजी सरपंचाचा संयम सुटला ; भरसभेत तरुणाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Jalgaon Gram Sabha Dispute : जळगा जिल्ह्यातील एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यात माजी सरपंचाकडून एका तरुणाला ग्रामसभेतच मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

Ganesh Sonawane

Jarangaon Gram Sabha Dispute : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी एका तरुणाने गावात धुर फवारणी यंत्राचा वापर का केला जात नाही अशी विचारणा प्रशासकांकडे केली. त्यामुळे संतापलेल्या माजी सरपंचाने तरुणाला मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी संबधित तरुणाकडून माजी सरपंचासह तिघांविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, जारगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरू असताना गावातील आनंद पाटील या तरुणाने गावात डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना धूर फवारणी का केली जात नाही असा जाब प्रशासकांना विचारला. ग्रामसभेत नागरिकांच्या उपस्थितीत हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर माजी सरपंचानी त्यात हस्तक्षेप केला व त्यावरून वाद निर्माण झाला. याच मुद्द्यावरून तरुण आनंद पाटील आणि माजी सरपंच सुनिल पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे.

आनंद पाटील या तरुणाने ग्रामसभेत मारहाण केल्याच्या घटनेप्रकरणी माजी सरपंच सुनील पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारीत उपसरपंच सुनिल पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्याने ग्रामसभेतील वादाचा विषय जिल्ह्यात चर्चेचा ठरला असून, वाद नेमका कशामुळे झाला, वादामागे काही पार्श्वभूमी आहे का, प्रत्यक्ष हाणामारी कशी झाली आणि त्यामध्ये कुणाचा सहभाग होता यासंदर्भात पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

माजी सरपंचाचा वेगळाच दावा

दरम्यान, याप्रकरणात माजी सरपंच सुनील पाटील यांनी आनंद पाटील याच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. आनंद पाटील याच्याकडे ग्रामपंचायतीची तब्बल ३६ हजार रुपयांची घरपट्टी थकीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच आपल्या प्लॉटवर आनंद पाटील याच्या घराचे सांडपाणी सोडले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सांडपाण्यामुळे केवळ आपल्या प्लॉटलाच नाही, तर परिसरातील किमान पाच घरांना त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा सुनील पाटील यांनी केला आहे.

दरम्यान या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि तक्रारीतील आरोपांची पडताळणी केल्यानंतरच घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. दरम्यान ग्रामसभा ही गावातील नागरिकांना स्थानिक प्रश्न मांडण्यासाठी आणि प्रशासनाकडून त्यावर चर्चा करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ मानले जाते. मात्र याच ग्रामसभेतच प्रश्न मांडताना वाद होऊन हाणामारीची वेळ आल्याने ग्रामस्थांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT