विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. इस्लामपूर या जयंतरावांच्या होमपीचमध्ये जाऊन अजितदादांनी चांगलीच बॅटींग केली. महाविकास आघाडीला केलेल्या अनेक घोषणा यांच्या बापाला तरी पूर्ण करता येतील का? असा प्रश्न अजितदादांनी उपस्थित केलो होता. त्याला जयंतरावांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
"उपमुख्यमंत्री सांगलीला गेले होते. त्यांनी सांगितलं एवढ्या योजना केल्यात, यांच्या बापालाही पूर्ण करता येणार नाही… अरे बापाला नाही, तुझा काकाच पूर्ण करणार… बापाचा विषयच नाही इथे… काकाच हा सगळा विषय पूर्ण करणार. तुम्ही चिंताच करू नका," असं म्हणत जयंतरावांनी अजितदादांना डिवचलं आहे.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांच्या प्रचारार्थ आष्टा येथील जाहीर सभेत अजित पवार यांच्या निशाण्यावर जयंत पाटील होते. "जयंत पाटील यांना 35 वर्षात मतदारसंघाचा चौफेर विकास साधता आला असता. परंतु त्यांनी मिळालेल्या पदाचा आणि सत्तेचा वापर फक्त राजकारणात ओव्हरटेक करणाऱ्यांची जिरवा-जिरवी करण्यासाठी केला," असा अजित पवार यांनी केला आहे.
लोकसभा निवडुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार काढला. सगळी आमची टोळी तिकडे गेली. मला देखील म्हणाले, तुम्ही पण चला, मात्र मी म्हणालो निष्ठा सोडणार नाही. भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची फाईल आर आर पाटील यांच्याकडे आली असेल. त्यांनी सही केली असेल. मात्र त्यानंतर सरकार बदललं, मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावर सही केली. आणि तेच कागदपत्रे अजित पवारांना मुख्यमंत्र्यांनी बोलावून दाखवले, मात्र त्यावर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सही होती ना…, असं म्हणत आर. आर. पाटील यांच्याबाबत अजित पवारांनी केलेल्या विधानाला जयंतरावांनी उत्तर दिले.
आपल्या मतदार संघातील इस्लामपूर व आष्टा बसस्थानकाची काय अवस्था झाली आहे ? ते पहा. दिवाळी सर्वांना सोबत घेऊन गोडधोड करायची असते. स्वतःच करून खायची नसते. तुम्हाला साधी मतदारसंघातील नागरिकांची दिवाळी साजरी करता येत नाही आणि तुम्ही मुख्यमंत्री पदाची स्वप्ने बघता.
लाडकी बहीण योजनेवरुन जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "लोकसभेआधी त्यांना बहिणी लाडक्या नव्हत्या. लोकसभेला बहिणीला विरोध होता. लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्यात. पण आमच्या लाडक्या बहिणी या सावत्र भावांना फसणार नाही. महिला, मुलींवर अत्याचार होतात, असे जयंत पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.