Jayant Patil & Uday Sangle Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil Politics: उदय सांगळे तुतारी फुंकणारच, मात्र प्रवेश केव्हा? हे विरोधकांच्या हाती...

Jayant Patil politics, Uday Sangle may join NCP Sharad Pawar soon, But when?-खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटापासून दुरावलेले उदय सांगळे विधानसभेची उमेदवारी करण्यावर ठाम आहेत.

Sampat Devgire

Sinnar constituency: विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवार कोण? याची चर्चा प्रत्येक मतदारसंघात सुरू आहे. सिन्नर मतदारसंघात याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

लोकसभा निवडणुकीत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटापासून फरकत घेतलेले उदय सांगळे गेली सहा महिने विधानसभा निवडणुकीची तयारी करीत आहेत. मात्र ते कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार याचा गोंधळ मिटलेला नाही. वाजे यांच्यापासून दूर गेल्याचा राजकीय फटका त्यांना बसला आहे.

या मतदारसंघातून विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात प्रबळ उमेदवारांचा शोध अद्याप संपलेलं नाही. या अनुषंगाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विविध इच्छुक नेते पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या संपर्कात आहेत. यातील विविध इच्छुकांनी सागंळे यांच्या प्रवेशाला विरोध केला आहे.

मतदारसंघात महाविकास आघाडीच्या कोणत्या घटक पक्षाला हा मतदारसंघ सोडणार?. उमेदवार कोण? ही अवघड जबाबदारी पक्ष नेतृत्वाने खासदार वाजे यांच्यावर सोपविली आहे. अशा स्थितीत खासदार वाजे यांना आता लवकर हालचाली करून आमदार कोकाटे यांच्या विरोधात आघाडीचा उमेदवार निश्चित करावा लागणार आहे.

श्री सांगळे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सिन्नर दौऱ्यात याबाबतची चर्चा झाली. मात्र या मतदारसंघात आघाडीकडे प्रबळ उमेदवार नाही, याची खात्री श्री पाटील यांनाही झाली आहे.

या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे इच्छुक आणि जयंत पाटील यांच्या चर्चेतून देखील ठोस तोडगा निघू शकलेला नाही. उदय सांगळे यांचा नवरात्रोत्सवातच प्रवेश होणार होता. मात्र शिवसेनेच्या इच्छुकांनी खासदार राऊत यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

श्री. सांगळे यांचा प्रवेश लांबला. आता निवडणूक जाहीर झाली आहे. श्री सांगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे प्रवेश करण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे एक दोन दिवसात याबाबतचा निर्णय होऊ शकतो.

सिन्नर मतदारसंघात यंदाची निवडणूक सध्या तरी महायुतीचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार कोकाटे यांना सोपी जाणवते आहे. त्याचे प्रमुख कारण त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार ठरलेला नाही. त्यामुळे खासदार वाजे यांना कोकाटे यांचा प्रतिस्पर्धी कोण? याचा निर्णय लवकरच घ्यावा लागणार आहे.

उमेदवारीबाबतचा निर्णय निश्चितच सोपा नाही. त्यामुळे तिसरे उमेदवार म्हणून चर्चेत असलेले उदय सांगळे हे तुतारी हाती घेण्यावर ठाम आहेत. ते वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे हा प्रवेश केव्हा होतो? की पुन्हा लांबतो? याची उत्सुकता वाढली आहे. या संदर्भात वाजे गट आक्रमक होऊन प्रबळ उमेदवाराचा शोध घेत असल्याचे चित्र आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT