Nana Patole politics: नाना पटोले यांचे संकेत; खोसकर यांनी काँग्रेस सोडली, निर्मला गावित यांची सोय केली?

Nana Patole; MLA Khoskar left Congress & facilitated Nirmala Gavit-आमदार हिरामण खोसकर यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेस इच्छुकांत आनंदाच्या उकळ्या
Nirmala Gavit, Nana Patole & Hiraman Khoskar
Nirmala Gavit, Nana Patole & Hiraman KhoskarSarkarnama
Published on
Updated on

Gavit Vs Khoskar: आमदार हिरामण खोसकर यांनी काल सायंकाळी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला. खोसकर यांच्या मतदारसंघात उमेदवार कोण याची चर्चा सुरू झाली आहे.

इगतपुरी मतदारसंघाचे आमदार खोसकर यांना विधान परिषदेच्या मतदानात क्रॉस वोटिंग चांगलीच महागात पडली. अनुकूल वातावरण असताना त्यांची पक्षाने चांगलीच कोंडी केली. अखेर त्यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

आता आमदार खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात आहेत. ते महायुतीचे उमेदवार होतील, अशी स्थिती आहे. त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि काँग्रेसचे संपतराव सकाळे हे दोन प्रमुख नेते अजित पवार पक्षात गेले आहेत.

या घडामोडींनी इगतपुरी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. या मतदारसंघात काँग्रेसकडे सर्वाधिक १५ इच्छुक आहेत. दोन दिवसांपूर्वी आणखी तीन इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

Nirmala Gavit, Nana Patole & Hiraman Khoskar
Nana Patole Politics: पटोलेंनी फडणवीसांची सगळीच काढली, म्हणाले "हा तर बेईमान भाऊ आणि सर्वात अपयशी गृहमंत्री"

इच्छुक उमेदवारांची संख्या सातत्याने वाढत असतानाच सध्या शिवसेनेच्या उपनेते असलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार गावित यादेखील इच्छुक उमेदवार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता.

शिवसेनेकडून उमेदवारी केली. त्यात त्यांचा पराभव झाला. अशा स्थितीत आगामी निवडणुकीत त्यांची दिशा काय याविषयी उत्सुकता होती. आमदार खोसकर हे विद्यमान आमदार असल्याने माजी आमदार गावित यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नव्हता. उमेदवारीचे ही संकेत नव्हते.

काँग्रेसकडेही आधीच गर्दी असल्याने माजी आमदार गावित यांना प्रवेश मिळेल याची शाश्वती नव्हती. प्रयत्न करूनही नेत्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नव्हता, असे बोलले जाते. आमदार खोसकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Nirmala Gavit, Nana Patole & Hiraman Khoskar
Sameer Bhujbal Politics: पंकज भुजबळांच्या विधान परिषद नियुक्तीने सुहास कांदे यांचा मार्ग मोकळा होईल का?

विद्यमान आमदाराने राजीनामा दिल्याने उमेदवारीवर पहिला हक्क असलेला नेता आता विरोधकांत सामील झाला आहे. परिणामी काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये आशा निर्माण झाली आहे. विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिक येथे सूचक संकेत दिले आहेत.

माजी आमदार गावीत काँग्रेस पक्षात आल्यास त्यांचे स्वागत करू, असे पटोले म्हणाले. श्री. पटोले यांच्या या विधानाने मतदारसंघातील राजकीय चित्र बदलण्याची चिन्हे आहेत. खोसकर यांच्या विरोधात प्रबळ उमेदवार कोण? याची उणीव महाविकास आघाडीत होती. आता माजी आमदार गावित महाविकास आघाडीत अर्थात शिवसेना ठाकरे आणि काँग्रेस पक्षाकडे एक प्रभावी उमेदवार म्हणून चर्चेत येऊ शकतात. यामध्ये इगतपुरी मतदारसंघातील राज्यकारण कोणती कोच घेते याची उत्सुकता वाढली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com