Jayant-Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayant Patil Politics: संयमी जयंत पाटील यांचाही संयम सुटला, म्हणाले, पहलगाम हल्ला हे केंद्राचे मोठे अपयश!

Jayant Patil;Jayant Patil criticizes BJP, says Pahalgam incident centre failed -केंद्र सरकारचे जम्मू काश्मीर विषयीचे सर्व दावे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने पोकळ ठरले आहेत.

Sampat Devgire

Jayant Patil News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सामान्यता संयमी प्रतिक्रिया व्यक्त करीत असतात. मात्र पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेवर त्यांचाही संयम सुटला. त्यांनी केंद्र शासनाचा अतिशय परखड शब्दात समाचार घेतला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यातील दोघांच्या कुटुंबीयांची सांत्वन्पर भेट घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धीर दिला होता. शरद पवार यांनी केंद्र शासनाच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनीही पहलगाम हल्ला हा केंद्र शासनाचे अपयश आहे. आजवर केंद्र शासनाकडून काश्मीर अत्यंत सुरक्षित आहे. दहशतवादी घटना संपुष्टात आल्या आहेत. असे विविध दावे केले होते.

केंद्र शासनाचे सर्व दावे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पोकळे ठरले आहेत. ज्या ठिकाणी हल्ला झाला तेथे कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती याचे आश्चर्य वाटते. याचा अर्थ आपली यंत्रणा किती गाफील आहे हे स्पष्ट होते. या हल्ल्यातून बचावलेल्या नागरिकांनी याबाबत अनेक प्रश्न सरकारला विचारले आहेत.

लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांना सीमेहून देशाच्या आताली भागात ३०० किलोमीटर अंतरापर्यंत देखील हल्ला होऊ शकतो, याचा अंदाज असायला हवा होता. दहशतवादी सहजपणे मोठ्या संख्येने पर्यटक असलेल्या ठिकाणी पोहोचतात. निरपराध आणि बेसावध पर्यटकांवर हल्ला करतात, हे सर्व धक्कादायक वाटते, असे जयंत पाटील म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे? याचा शोध घेतला पाहिजे. संबंधित दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्याचबरोबर या विषयावर राजकारण न करता ठोस पावले उचलली जावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT