Jaykumar Rawal & Satyajeet Tambe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jaykumar Rawal politics: एकीकडे विधिमंडळात चर्चा दुसरीकडे धुळ्यात वकिलाच्या घरात दरोडेखोरांचा धुडगूस, राज्यात चाललय तरी काय?

Jaykumar Rawal;On one hand, there is a discussion about attacks on lawyers, on the other hand, there is a scuffle at a lawyer's house in Dhule- मंत्री जयकुमार रावल यांनी वकिलावरील हल्ल्याची गंभीर दखल घेत दिल्या तपासाच्या सूचना

Sampat Devgire

Dhule Crime News: नाशिकमध्ये वकिलावर हल्ला अहिल्यानगरला वकिलाची हत्या या घटकांमुळे वकिलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या संदर्भात विधिमंडळात चर्चाही झाली. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा हा प्रश्न गंभीर बनला आहे.

दोंडाईचा (धुळे) येथील ॲड रवींद्र मोरे यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री दरोडा पडला. चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी दरवाजा तोडून हल्ला करण्यात आला. लोखंडी रॉड, चाकू आणि अन्नशास्त्रांसह वकील व त्यांच्या कुटुंबाला धमकावण्यात आले. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

घरातील सोने अन्य मौल्यवान वस्तू आणि रोकड अशी चोरी करून याबाबत वाच्यता केल्यास ठार करण्यात येईल अशी धमकी दरोडेखोरांनी दिली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सोनल मोहन पवार यांनी याबाबत दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

गेल्या आठवड्यात तीन ते चार युवकांनी नाशिकला वकिलाच्या कार्यालयावर हल्ला केला. कार्यालयात घुसून बोराडे यांना बेदम मारहाण करण्यात आले. त्यांच्यावर प्राण घातक हल्ला झाला. त्यात त्यांच्या मदतीला धावून आलेल्या पत्नी देखील गंभीररित्या जखमी झाल्या. आरडाओरोड झाल्याने नागरिकांनी एका हल्लेखोर याला पकडून ठेवले.

अहिल्यानगर येथे देखील वकील असलेल्या बरोबर बोराडे आणि त्यांच्या पत्नीचा खून करण्यात आला. वकिलांवरील हल्ल्याच्या या घटकांमुळे तीव्र प्रतिक्रिया कुमटत आहे. याबाबत नाशिक बार असोसिएशनने बार कौन्सिल कडे तक्रार केली आहे. न्यायालयाच्या आवारात निदर्शने देखील करण्यात आली.

यासंदर्भात विधान परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. वकिलांवर होणारे वाढते हल्ले आणि येणाऱ्या धमक्या याबाबत शासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे. वकिलांना संरक्षण देण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली होती. मात्र त्यावर पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही.

एकीकडे वकिलांवरील हल्ल्याच्या तक्रारींची विधिमंडळात चर्चा होत होती. महायुतीचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघात दोंडाईचा येथे वकिलाच्या घरी सशस्त्र दरोडेखोरांनी काही दोष घातला. याबाबत मंत्री रावण यांनी तातडीने पोलिसांची संपर्क करून कारवाई करण्याच्या आदेश दिले. मात्र या निमित्ताने वकिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT