BJP Suresh Dhas son Sagar accident : भाजप आमदार धस यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात; धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Beed Ashti BJP MLA Suresh Dhas Son Sagar Involved in Car Accident; Two-Wheeler Rider Killed on Ahilyanagar-Pune Road : अहिल्यानगर-पुणे रस्त्यावर पारनेरच्या सुपा शिवारात भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या वाहनांकडून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.
BJP Suresh Dhas son Sagar
BJP Suresh Dhas son SagarSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Pune road accident : भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलगा सागर याच्याकडील वाहनानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे.

अहिल्यानगर-पुणे रस्त्यावर पारनेरच्या सुपा शिवारातील जातेगाव फाट्यावर हा अपघात रात्री अकरा वाजता झाला आहे. सुपा पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.

पारनेरच्या जातेगाव घाट फाट्यावर हा अपघात झाला असून, यात नितीन शेळके (वय 34, पळवे खुर्द, ता. पारनेर) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. आष्टी मतदारसंघाचे भाजपचे (BJP) आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर याच्याकडील चारचारी वाहनाने हा अपघात झाला.

अपघातावेळी वाहनात सागर सुरेश धस (Suresh Dhas) (रा. आष्टी, बीड) आणि सचिन दादासाहेब कोकणे (रा. तवलेवाडी, ता. आष्टी. जि.बीड) हे दोघे जण होते. दुचाकीस्वाराला मागून धडक बसल्याचे माहिती समोर येत आहे.

BJP Suresh Dhas son Sagar
Karnataka Congress crisis : 40 आमदार नाराज, मनधरणीत दमछाक; सूरजेवालांची आमदारांना पक्षाच्या चौकटीतच राहण्याची ताकीद

दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून पारनेरकडे येत असताना, सागर धस याच्या वाहनाने मागून धडक जोराची धडक बसली. अपघात झाल्यानंतर त्याची माहिती सुपा पोलिसांना कळवण्यात आली. यानंतर जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता.

BJP Suresh Dhas son Sagar
Satyajit Tambe : सत्यजीत तांबे म्हणतात, बिहार, झारखंडला शक्य, त्यात महाराष्ट्र मागे का?

सुपा पोलिसांनी सागर धस याच्याकडील वाहन ताब्यात घेतलं असून, अपघाताची नोंद घेतली आहे. वाहनातील सागर आणि सचिन या दोघांची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली आहे. पारनेर तालुक्यातील सुपा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com