Honey-Trap-Scandal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Honey Trap scandal: हनी ट्रॅप विधिमंडळातील चर्चेने कोणत्या मंत्र्यांची उडाली झोप?, काय आहे गुजरात पॅटर्न?

Jitendra Avhad; Nashik and Honey Trap Who is the minister who lost sleep over the Nashik honey trap and 'Gujarat pattern' allegation made by Jitendra Awhad?-जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या 'गुजरात पॅटर्न'आणि हनी ट्रॅप कनेक्शन मध्ये किती आहे सत्यता?

Sampat Devgire

Nashik Honeytrap News: विधिमंडळात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित केलेल्या 'हनी ट्रॅप' या धक्कादायक प्रकारावर कोणत्याही वरिष्ठ मंत्र्यांनी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण चर्चेलाच येऊ नये असे सत्ताधारी पक्षाचा प्रयत्न आहे. प्रयत्नामागे दडले तरी काय? याची आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक शहरातील एका राजकीय नेत्याशी संबंधित रिसॉर्टवर ७२ अधिकारी आणि काही मंत्र्यांच्या खाजगी गोष्टींचे चित्रीकरण झाल्याचे उघड झाले आहे. यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या काही मंत्र्यांची संबंधित हॉटेल संचालकांचे कनिष्ठ संबंध आहे. या मंत्र्यांचा वावर नाशिकमध्ये दौऱ्यात असताना केवळ या हॉटेलवरच असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे.

या संदर्भात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी चर्चा उपस्थित केली. यावेळी पटोले यांनी अनेक गंभीर आरोप केले. त्याहून धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. आमदार आव्हाड यांनी हनी ट्रॅप हा 'गुजरात पॅटर्न' असल्याचे विधान केले आहे.

गुजरातमध्ये काही वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे हनी ट्रॅप मध्ये वस्त्रहरण झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्याची जाहीर वाच्यता झाल्यावर संबंधित राजकीय नेत्यांचे करियर अक्षरशः संपुष्टात आले. काही आत्महत्यांचा संबंध त्याच्याशी जोडला गेला आहे. त्यामुळे या धक्कादायक प्रकाराचा महाराष्ट्राच्या राजकारणातही शिरगाव झाल्याच्या शंकेने अनेकांची झोप उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि संघटनात्मक पदाधिकाऱ्यांशी अत्यंत कनिष्ठ संबंध असलेल्या दोन मंत्र्यांचे नावे याबाबत दबक्या आवाजात घेतली जात आहेत. मंत्री कोण हे मात्र विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही सांगण्याची तयारी नाही. मात्र उत्तर महाराष्ट्रातील हे दोन्ही मंत्री असल्याची चर्चा नाशिक शहरात तरी उघडपणे सुरू आहे. त्यामुळे हा प्रकार कोणत्या वळणावर पोचतो या चिंतेने संबंधित मंत्र्यांची झोप उडणे स्वाभाविक आहे.

संबंधित प्रकरणात प्रामुख्याने पोलीस यंत्रणेतील उच्च पदावर कार्यरत अधिकाऱ्यांचा भरणा आहे. हे अधिकारी ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर अस्वस्थ झाले. या प्रकरणाशी संबंधित नाशिकचा तो व्यवसायिक आणि त्याची अल्पकाळात झालेली भरभराट यामुळे देखील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. प्रकरण चर्चेत येऊ नये म्हणून पोलीस यंत्रणात अतिशय कसोशीने कामाला लागल्याचे चित्र आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT