Dada Bhuse Politics: एकनाथ शिंदे यांचे शिलेदार दादा भुसे यांच्या जिल्हा परिषदेच्या मार्गात सहकारी भाजपचाच मोठा स्पीड ब्रेकर!

Dada Bhuse; Minister Dada Bhuse benefits from the opposition's disruption in this year's Zilla Parishad election -गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री दादा भुसे यांना होम पिचवरच पराभवाला सामोरे जावे लागले होते.
Dada-Bhuse
Dada-BhuseSarkarnama
Published on
Updated on

Dada Bhuse News: मालेगाव विधानसभा निवडणुकीत दादा भुसे यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मात्र जिल्हा परिषद आणि अन्य संस्था त्यांची गेल्या निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली होती. त्याचा वचपा काढण्याची संधी मंत्री भुसे यांना आहे. मात्र त्यात भाजप हा मोठा अडसर ठरू शकतो.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री दादा भुसे हे आता पक्षाच्या राज्यस्तरावरील नेत्यांमध्ये गणले जातात. त्यामुळे ही प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी त्यांना आपले होम पीच असलेल्या मालेगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत वरचष्मा टिकवावा लागेल. त्यासाठी दादा भुसे यांचे प्रतिष्ठान पणाला लागणार आहे.विरोधकांवर मात करण्यासाठी सत्तेचा कौशल्याने वापर करण्यात भुसे यांचा हातखंडा आहे. यंदा ते कोणता डाव टाकतात याची उत्सुकता असेल.

मालेगाव मतदारसंघात साकुरी (नि), खाकुर्डी, झोडगे, कळवाडी, दाभाडी, रावळगाव, सौंदाणे आणि निमगाव असे सर्वाधिक आठ जिल्हा परिषद गट आहेत. यातील तीन गट शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार सुहास कांदे यांच्या विधानसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. तीन गटांवर आमदार कांदे यांचा प्रभाव टिकून आहे.

Dada-Bhuse
MD Drugs Crime: धक्कादायक, एमडी ड्रग्स तस्करांशी पोलिसांचेच संबंध, जळगावच्या उपनिरीक्षकासह दुसरा पोलिस बडतर्फ!

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे पक्षाने दिली आहेत. मात्र त्यांच्याच पक्षाचे एकमेव आमदार सुहास कांदे यांच्याशी भुसे यांचे फारसे सख्य नाही. सध्या तरी आमदार कांदे यांनी आपल्या तीन गटांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे भुसे यांना एक प्रकारे अवघ्या पाच गटांमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावावी लागेल.

महायुतीचे मंत्री असलेले दादा भुसे यांच्या मार्गात त्यांचाच सहकारी भाजपचा मोठा स्पीड ब्रेकर आहे. विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे बारा बलुतेदार मित्रमंडळाचे बंडू काका बच्छाव यांच्या मागे विधानसभेतही संकटमोजकाची अदृश्य आणि अर्थपूर्ण शक्ती कार्यरत होती. सध्या प्रसाद हिरे डॉ तुषार शेवाळे पूर्वाश्रमीचे भाजप नेते सुनील गायकवाड यांसह भाजपने या मतदारसंघात चांगली जमवाजमव केली आहे. त्यात बच्छाव हे उघडपणे किंवा एक दोन गटांमध्ये आपली सर्व ताकद झोपून देतील अशी स्थिती आहे.

मालेगाव विधानसभा आणि शहर येथील राजकारण अतिशय वेगळे आहे. त्याचा एक पॅटर्न तयार झालेला आहे. यामध्ये भुसे विरुद्ध अन्यविरोधक पाच वर्ष एकमेकांवर आरोप आरोप करीत आव्हान देतात. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हे सर्व दोन गटात विभागले जातात. भुसे यांचे वरवर दिसणारे विरोधक या निवडणुकीत पडद्यामागे त्यांना मदत करणारे भूमिका घेतील का? हा कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.

मालेगाव मतदारसंघात मंत्री भुसे आणि शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे हे पारंपारिक विरोधक आहेत. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते अपूर्व हिरे यांचा कमी झालेला संपर्क त्यांची अडचण करू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बंडू काका बच्छाव ही तिसरी शक्ती तयार झाली आहे.

मालेगाव मतदारसंघात गेली २५ वर्ष भुसे हे आमदार आहेत. त्यांच्यासोबत असलेले बहुतांशी नेते आता साठीच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे युवा नेतृत्वाला या निवडणुकीत राजकीय आकांक्षाची पालवी फुटली आहे. या नव्या नेतृत्वाला संधी न दिल्यास भुसे यांची अडचण होणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com