Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jitendra Awhad : 'राम आणि राम मंदिर त्यांच्या बापाचे आहे का ?'

Prasad Shivaji Joshi

Nagar News : श्रीराम मांसाहार करत होते, या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) चहूबाजूंनी टीकेचे बाण सोडले जात असतानाच आता आव्हाडांचे आणखी एक वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून थेट भाजपला खडा सवाल केला आहे.

अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. लाखो भाविक त्यासाठी सोहळ्याच्या निमंत्रणाची मोठी चर्चा देशभरात सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, 'राम काय तुमच्या बापाचा आहे, मंदिर काय तुमच्या बापाचे आहे, मंदिराचे निमंत्रण देणारे तुम्ही कोण?' असा बोचरा सवाल भाजपला केला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) शिर्डीत अधिवेशन सुरू आहे. यात काल (3 जानेवारी) जितेंद्र आव्हाडांनी राम मांसाहार करायचे, असे वक्तव्य करून वादाला जन्म दिला. त्याचवेळी त्यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून भाजपलाही धारेवर धरले होते.

'भाजपला खरोखरच राम मंदिर स्थापन करायचे असते तर त्यांनी रामनवमीला का केले नाही?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला केला. शिर्डीत रामनवमी हा सर्वात मोठा उत्सव असतो आणि साईबाबांनी सर्वाधिक रामनामाचा जप केला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सध्या ज्या पद्धतीने राम मंदिर, राम मंदिर करत आहे ते फार काही पुढे जाईल, असे वाटत नाही, असे आव्हाड म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रपतींना जाणिवपूर्वक डावलण्याचे प्रकार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून आल्यामुळे त्यांना प्रत्येक वेळी डावलले जाते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

संसदेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी मुर्मू यांना डावलण्यात आले होते. श्रीराम चौदा वर्षे वनवासात असताना आदिवासी समाज त्यांना सर्वात जास्त जवळचा होता. परंतु भाजपला महिलांविषयी, आदिवासी समाजाविषयी तिरस्कार असल्यामुळे त्यांनी मुर्मू यांना डावलले. देशात सध्या उन्माद माजवला जात आहे. हिंदू-मुस्लिम समाजामध्ये जाणिवपूर्वक तेढ निर्माण केली जात आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT