Maharashtra Politics Latest News : प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल केले. या विधानाच्या निषेधार्थ राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज पुण्यातील अलका टॉकीज चौकात भाजपचे Pune शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली तिरडी आंदोलन करण्यात आले. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
अयोध्येत प्रभू श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारीला होत आहे. त्याची जय्यत तयार सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने या कार्यक्रमासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे राज्यव्यापी अधिवेशन शिर्डी (ता. राहाता) येथे सुरू आहे. या शिबिरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या आहाराविषयी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.
या वादाचे पडसाद संबंध महाराष्ट्रभर उठत असताना पुण्यातही भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. अलका चौकात भाजपने आंदोलन केले. यावेळी जितेंद्र आव्हाडांच्या निषेधाच्या दिल्या घोषणा. तसेच तिरडी आंदोलन करण्यात आले. ही आणलेली तिरडी आंदोलकांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलिसांनी विरोध केला. त्यामुळे काही काळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. स्थितीवर नियंत्रण मिळवत पोलिसांनी तिरडी ताब्यात घेऊन चौकीमध्ये ठेवली. यानंतर बराच काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध भाजपच्या पदाधिकारी आंदोलनाला उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काय म्हणाले आव्हाड?
'राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहरी होता. 14 वर्षे वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात?', असे वक्तव्य करून जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधून घेतले आहे. 'आपण इतिहास वाचत नाही. राजकारणात वाहून जातो. राम हा आमचा, बहुजनांचा आहे. शिकार करून खाणारा राम हा बहुजनांचा आहे. रामाचा आदर्श सांगून लोकांवर शाकाहार थोपवला जात आहे. 14 वर्षे जंगलात असणारे राम शिकार करायचे', असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.