Ashok Kharat Case : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातविरोधात अत्याचार व फसवणुकीचे एकुण अकरा गुन्हे दाखल झाले आहेत. आज नाशिक कोर्टात झालेल्या सुनावणीत खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तर दुसरीकडे त्याची पत्नी कल्पना खरात ही फरार असून, एसआयटी पथक व शिर्डी पोलिसांकडून फरार असलेल्या कल्पना खरात हिचा शोध सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून तिचा शोध सुरु असून ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
शिर्डी येथे भोंदू अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच कल्पना खरात फरारी झाल्या. कल्पना खरात यांचा तपास लावण्यासाठी एसआयटी पथकाने त्यांच्या नाशिक येथील घरी धाड टाकली होती. मात्र तिथे त्या आढळून आल्या नाही. मात्र पथकाने त्यांचा मुलगा हर्षवर्धन खरातला ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर त्याची सुटका देखील केली.
दरम्यान या प्रकरणात आता नवी अपडेट समोर आली आहे. कल्पना खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेता शिर्डी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिर्डी पोलिसांनी कल्पना खरात विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे आता कल्पना खरात हिचा परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
दरम्यान याआधी अशोक खरात याने देखील परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला होता. आता त्याची पत्नी कल्पना खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी आधीच तीचे मार्ग बंद केले आहेत.
दरम्यान पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केल्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर कल्पना खरातची माहिती देण्यात आली आहे. तिच्या परदेश प्रवासावर पूर्णपणे बंदी आली आहे. पोलिसांनी तिची सर्व बाजूंनी नाकेबंदी केली असून कोणत्याही मार्गाने ती देश सोडून पळून जाणार नाही याची दक्षता घेतली आहे. त्यामुळे या लुकआउट नोटीसमुळे फरार कल्पना खरात यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.